News18 Lokmat

रोहित तिवारी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पत्नी अपूर्वा शुक्ला अटकेत

एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी अपूर्वा शुक्लाला अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 12:36 PM IST

रोहित तिवारी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पत्नी अपूर्वा शुक्ला अटकेत

नवी दिल्ली,24 एप्रिल : एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी अपूर्वा शुक्लाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत. शनिवारी रात्री  क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अपूर्वाची तब्बल 8 तास चौकशी केली होती.

प्रकरणाला नवं वळण

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा 16 एप्रिलला संशयास्पद मृत्यू झाला. आता या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं आहे. रविवारी (21 एप्रिल) पोलिसांनी रोहित यांची पत्नी अपूर्वा तिवारी आणि घरात काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हत्याकांड प्रकरणात त्यांच्या पत्नीचा सहभाग असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस मुख्य आरोपी म्हणून अपूर्वाकडे पाहत आहेत. यासंदर्भात शनिवार (20 एप्रिल) रात्रीदेखील क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अपूर्वा यांची जवळपास 8 तास चौकशी केली.

दरम्यान रोहित यांच्या आई उज्ज्वला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रोहित आणि अपूर्वा यांचे नातेसंबंध चांगले नव्हते. रोहित आणि अपूर्वाचे सतत वाद होत असत, त्यामुळे तो तणावात होता. लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शेखर आणि अपूर्वामध्ये वादविवाद सुरू होते.रोहितची हत्या माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे'.

दुसरीकडे, रोहित यांचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती पोस्टमार्टेम अहवालात समोर आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Loading...



वाचा अन्य बातम्या

पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपसाठी वाईट बातमी, बसू शकतो धक्का

VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी

VIDEO : पंतप्रधान मोदी आपला पगार आईकडे देतात का? मुलाखतीत दिलं उत्तर

VIDEO : 3 वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी सोडलं, कार पुढे जाताच चाकाखाली सापडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...