• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • काँग्रेसच्या नेत्याला पोलिसांनी सापळा रचून केली अटक, 2000 रुपयांचं ऑक्सिमीटर विकत होता 7 हजारांना

काँग्रेसच्या नेत्याला पोलिसांनी सापळा रचून केली अटक, 2000 रुपयांचं ऑक्सिमीटर विकत होता 7 हजारांना

Indore Conress Leader Oxymeter Black Marketing: पोलिसांनी ग्राहक बनून ऑक्सिमीटर मागवले आणि जेव्हा आरोपी ऑक्सिमीटर द्यायला आला त्यावेळी त्याने 7 हजार रुपये मागितले, तेव्हा त्याला रंगेहात पकडले.

 • Share this:
  इंदूर, 09 मे: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) काँग्रेसच्या नेत्यांपैकी (Congress Leader) एक असलेल्या यतींद्र वर्मा (Yatindra Varma) याला पोलिसांनी ऑक्सिमीटरचा काळाबाजार करताना अटक केली आहे. जास्त दरांत ऑक्सिमीटरची (Oxymeter) विक्री करत असल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांनी ग्राहक बनून त्याला जाळ्यात ओढलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी यतींद्र वर्मा काँग्रेसचा नेता आणि सक्रीय सदस्य आहे. वर्मा ऑक्सिमीटरचा काळाबाजर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 2 हजार रुपये किंमत असलेले ऑक्सिमीटर 7 हजार रुपयांना विक्री करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळं पोलिसांनी सापळा रचला आणि पोलिस ग्राहक बनून त्याच्याकडे गेले. या सापळ्यात अडकल्यानं वर्माला अटक करण्यात आली. (हे वाचा-बीड : 50 हजारांसाठी वृद्ध पित्याचा अमानुष छळ; विष पाजून तारेनं आवळला गळा) पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर आरोपी यतींद्र वर्माला फोन केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचं सांगत ऑक्सिमीटर हवं असल्याची मागणी केली. फोनवर त्यांनी ऑक्सिमीटर मागवले. त्यानंतर डिलिव्हरी द्यायला आला तेव्हा त्यानं ऑक्सिमीटरसाठी 7 हजार रुपये मागितले आणि पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. आरोपी यतींद्र वर्माचे सोशल मीडियावर राहुल गांधींबरोबरचे फोटो आहेत. तसंच त्यांनी शिवराज सिंग यांच्या सरकारविरोधात अनेक वक्तव्यंही केली आहेत. (हे वाचा-कोरोनामुळं पतीचा मृत्यू; मृतदेह पाहून पत्नीची दवाखान्यात सहाव्या मजल्यावरून उडी) कोरोनाचं प्रमाण वाढल्यानंतर रुग्णांचे आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. आधीच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरसारख्या औषधांच्या काळाबाजाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यात जर लोकप्रतिनिधीच अशाप्रकारे नागरिकांना लुटत असतील तर सामान्य जनतेनं कुणाकडं जावं असा प्रश्न उपस्थित होतो.
  Published by:News18 Desk
  First published: