डोळे दिपवणारी आहे गँगस्टर विकास दुबेची संपत्ती, 3 वर्षात केला 10 देशांचा दौरा

डोळे दिपवणारी आहे गँगस्टर विकास दुबेची संपत्ती, 3 वर्षात केला 10 देशांचा दौरा

खंडणी, खून, अपहरण, ब्लॅकमेलिंग, राजकारण काळा व्यापार अशा अनेक गोष्टींमधून त्याने गेली तीन दशकं प्रचंड संपत्ती गोळा केली आहे.

  • Share this:

लखनऊ11 जुलै: गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर आता अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहे. गेली 30 वर्ष उत्तर प्रदेशात धुमाकूळ घालणारा हा गुंड गुरूवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं होतं. आता विकासच्या अनेक गोष्टी बाहेर येत आहे. खंडणी, खून, अपहरण, ब्लॅकमेलिंग, राजकारण काळा व्यापार अशा अनेक गोष्टींमधून त्याने गेली तीन दशकं प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. पोलीस आता त्याच्या काळ्या संपत्तीची माहिती गोळा करत आहे.

विकास दुबेने गुंडांची मोठी टोळी तयार करून प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच आधारे त्याने पैसे गोळा केले होते. गेल्या 3 वर्षांमध्ये त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 10 पेक्षा जास्त देशांचा दौरा केल्याची माहितीही पुढे आली आहे.

दुबई, थायलंड आणि इतर काही देशांमध्ये त्याने कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे. लखनऊमध्ये नुकताच त्याने 20 कोटींचा बंगला घेतला होता. आता त्याच्या इतर सहकाऱ्यांकडून पोलीस सगळी माहिती गोळी करत असून सर्व अवैध संपत्ती जप्त केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

ते फकस्त 600 व्हते! बाजीप्रभूंच्या पराक्रमावर आधारित 'जंगजौहर'चा पहिला लूक

कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेशकुमार पी यांनी सांगितले की, सकाळी हा अपघात झाला. ते म्हणाले 'जोरदार पाऊस पडत होता. पोलिसांनी दुचाकीला धडक दिल्याने गाडी पलटी झाली आणि गाडीतील पोलीस जखमी झाले. त्याच संधीचा फायदा घेत दुबे याने पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला स्वाधीस होण्यास पोलिसांनी सांगितले. मात्र विकासने गोळी चालवल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

दुसरीकडे, विकास दुबे याचे वडील रामकुमार दुबे यानी मौन सोडलं आहे. 'बरं झालं त्याला ठार मारलं, त्याच्या अंत्यविधीलाही जाणार नाही', असं रामकुमार दुबे यांनी सांगितलं होतं. तर विकास दुबे याची आई सरला देवी यांनी स्वत: घरात बंद करून घेतलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सरला देवी यांची प्रकृती बिघडली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

श्रद्धांजली सभेतच झाला राडा, फुलं वाहण्याऐवजी लोकांनी केली हाणामारी!

तत्पूर्वी सरला देवी यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, विकास दुबेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्या कानपूरलाही जायला तयार नाहीत. लखनऊमध्येच राहाणे त्यांनी पसंत केलं आहे. सरकारला जे योग्य वाटतं ते करावं, अशी प्रतिक्रिया देखील सरला देवी यांनी गुरुवारी विकास दुबेला अटक झाल्यानंतर दिली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 11, 2020, 6:40 PM IST
Tags: encounter

ताज्या बातम्या