IndiaStrikesBack- भारतीय वायुदलाची शक्ती पाहून घाबरले पाकिस्तान, पलटवार करण्याऐवजी घेतलं एक पाऊल मागे

IndiaStrikesBack- भारतीय वायुदलाची शक्ती पाहून घाबरले पाकिस्तान, पलटवार करण्याऐवजी घेतलं एक पाऊल मागे

भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानने भारतीय वायुदलाला रोखण्यासाठी पाकिस्तानचे F16 विमानाचा वापर केला.

  • Share this:

बालकोटा, २६ फेब्रुवारी २०१९- भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये मंगळवारी पहाटे मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले. सुमारे २०० ते ३०० दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. भारतीय वायुसेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे ६० किमी आत घुसली होती. यावेळी 'मिराज २०००' या १२ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूद केले.

भारताकडून लेझर गायडेड बॉम्ब हल्ला करण्यात आला. सुमारे २१ मिनिटं भारताने दहशतवाद्यांच्या या तळांवर एअर स्ट्राइक केलं. यावेळी पाकिस्तानाकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याआधीच भारतीय विमानं एअर स्ट्राइक करून भारतात परतली.

आता पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानने भारतीय वायुदलाला रोखण्यासाठी पाकिस्तानचे F16 विमानाचा वापर केला. मात्र भारतीय वायुसेनेच्या फॉर्मेशनसमोर पाकिस्तानचे F16 विमान टिकू शकले नाही आणि त्या विमानाला परत जावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न एअर कमांडने हे ऑपरेशन केले होते.

पुलवामा येथे सीआरपीएफवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. वायुदलाच्या १२ मिराज २००० या लढाऊ विमानांनी पीओकेमध्ये घुसून बालाकोट, मुजफ्फराबाद, चकोटी येथील जैशच्या तळांवर हल्ला केला.

पाकिस्तानने रात्रभर केली गोळीबार-

असं म्हटलं जातं की, भारत- पाकिस्तानच्या सीमेवर लढाऊ विमानं उडल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी रात्री पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबारी केली. अनेक ठिकाणी त्यांनी मोर्टारची फायरिंग केली.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव...

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचा वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव टाकत चारी मुंड्या चीत केलं. यात पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही भारताने काढून घेतला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर १००० किलोचे बॉम्ब फेकले. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.

IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

First published: February 26, 2019, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading