#Poha आता पोह्यांनी केली भाजपची अडचण; CAA, बांगलादेश आणि पोहे... काय आहे राजकारण?

#Poha आता पोह्यांनी केली भाजपची अडचण; CAA, बांगलादेश आणि पोहे... काय आहे राजकारण?

'सतत पोहे खाण्याच्या सवयीमुळे ते बांग्लादेशी असावेत असा संशय आला', असं अजब वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केलं आणि सोशल मीडियावर पोह्यांनी गहजब केला. #Poha दिवसभर ट्रेंडिंग होता. सरकारनेही शेवटी याची दखल घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि त्याला होणारा विरोध यामुळे भारतीय जनता पक्षाला वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. त्यातच शुक्रवारी भाजपच्या बड्या नेत्यानं केलेलं एक वक्तव्य पक्षाला चांगलंच भोवलं. भाजपचे हे राष्ट्रीय सरचिटणीस CAA वरून चक्क पोह्याव घसरले आणि सोशल मीडियावर या नेत्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं. "माझ्या घरात काम करणाऱ्या काही बांधकाम मजुरांची त्यांच्या विचित्र खाण्याच्या सवयींमुळे मला शंका आली. ते सारखे पोहे खायचे. त्यामुळे मला ते बांग्लादेशी असल्याचा संशय आला. मला संशय आलाय हे लक्षात येताच दोन दिवसात ते काम सोडून निघून गेले", असं अजब वक्तव्य केलं आहे कैलास विजयवर्गीय यांनी.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांची पोह्यांवरची ही मल्लीनाथी वाचून सोशल मीडियावर #Poha पोहे अर्थातच ट्रेंड करू लागले आणि विजयवर्गीय यांची नेटकऱ्यांनी चांगलीच खरडपट्टी केली. पोहे खाणारे देशद्रोही आहेत का असं नेटकरी विचारू लागले.

इंदौरमध्ये बोलताना कैलास विजयवर्गीय यांनी हे विचित्र वक्तव्य केलं. इंदूरी पोहे मिळणाऱ्या गाड्यांचाच फोटो अनेकांनी ट्वीट केला आणि हे सगळे बांग्लादेशी आहेत का असा सवाल केला.

दिवसभर इंटरनेट आणि सोशल मीडियावर हे पोहे प्रकरण चांगलं तिखट-मीठ लावून चघळले जात होते.

महाराष्ट्र काँग्रेसनेही ट्वीट करत कांदेपोहे हा मुंबईकरांचा लाडका पदार्थ असल्याचं म्हणत पोहे खायचं निमंत्रण विजयवर्गीय यांना दिलं.

वारिस पठाण यांनीदेखील मोदींच्या कपड्यांवरच्या प्रतिक्रियेचीही खिल्ली उडवली.

बांधकाम मजूर सकाळ - संध्याकाळी पोहेच खाताना बघून त्यांचा संशय आला आणि ते भारतीय नागरिक नसावेत, असं वाटलं, असं विजयवर्दीय म्हणाले होते. याची पोह्यांचा एवढा ऊहापोह झाला की शेवटी केंद्र सरकारच्या औपचारिक पत्रकार परिषदेतही हे पोहे आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना एका पत्रकार परिषदेत या पोह्यांविषयी विचारण्यात आलं. ते काय म्हणाले पाहा...

"हा काही मोठा प्रश्न वगैरे नाही. मीसुद्धा पोहे खातो आणि तुम्हालाही खायला घालतो", असं म्हणत जावडेकरांनी हा प्रश्न टोलवला.

Tags: BJPpoha
First Published: Jan 24, 2020 06:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading