कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास वर्ष 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास  वर्ष 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील 24 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली.

मराठी कवी श्रीकांत देशमुख लिखित  बोलावे ते आम्ही ’ या  काव्यसंग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.  1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी पुरस्कार दिला गेलाय.

सुजाता देशमुख अनुवादित 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. माय नेम इज गौहर जान या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. ५० हजार रुपये रोख ,ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

12 फेब्रुवारी 2018रोजी  या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक संजय पवार, पुष्पा भावे आणि सदानन्द मोरे यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 06:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading