Home /News /national /

'दिल्लीवालोंसे डर लगता है', गुलजार यांचे मोदी आणि अमित शहांवर शब्दबाण!

'दिल्लीवालोंसे डर लगता है', गुलजार यांचे मोदी आणि अमित शहांवर शब्दबाण!

'दिल्लीवालोंसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं...' असं खास त्यांच्या शैलीतलं विधान गुलजार यांनी केलं.

    अभिषेक पांडे मुंबई, 28 डिसेंबर : गीतकार गुलजार यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली. 'दिल्लीवालोंसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं...' असं खास त्यांच्या शैलीतलं विधान गुलजार यांनी केलं. एका वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलजार यांनी हे वक्तव्य केलं. दिल्लीवाल्यांची भीती वाटते, ते कोणता नवा कायदा आणतील माहीत नाही...असं ते म्हणाले. गुलजार यांनी आपल्या भाषणात "दोस्तों...." "...मित्रों कहते-कहते रुक गया..." असंही गुलजार म्हणाले. सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून आंदोलनं सुरू आहेत. याचा संदर्भ देत गुलजार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका केली असावी. मी महाराष्ट्रीयन मला स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवून घेण्याचा हक्क आहे. मी कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचं उदाहरण आहे. पंजाबमध्ये जन्म झाला, बंगालवर प्रेम केलं आणि वाढलो महाराष्ट्रात, असंही गुलजार यांनी सांगितलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा गौरव करण्यात आला. =========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Amit Shah, Gulzar, Pm modi

    पुढील बातम्या