S M L

ज्येष्ठ कवी गोपालदास निरज यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ हिंदी कवी तसेच सुप्रसिद्ध कवी गोपालदास निरज यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स मध्ये हलविण्यात आले. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

Updated On: Jul 19, 2018 10:00 PM IST

ज्येष्ठ कवी गोपालदास निरज यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

दिल्ली, ता. 19 जुलै : ज्येष्ठ हिंदी कवी तसेच सुप्रसिद्ध कवी गोपालदास निरज यांचे गुरुवारी निधन झाले. मंहळवारीच त्यांना लोटस हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स मध्ये हलविण्यात आले. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गोपालदास नीरज याचा जन्म 4 जनेवारी 1925 रोजी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील पुरवली या गांवात झाला होता. मृत्यू समयी ते 93 वर्षांचे होते.

VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर

कवी गोपालदास नीरज यांनी आपल्या अनोख्या हिंदी काव्यशैलीने अनेक व्यासपीठे गाजविलीत. बॉलीवूड सृष्टीतील हिंदी सिनेमांसाठी त्यानी अनेक सुपरहिट गाणी लिहीलीत. अजरामर झालेल्या अनेक गितांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना 1991 साली पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. नीरज यांना 2007 मध्ये  पद्मभूषण सम्मान ही प्रदान करण्यात आला. इतकेच नव्हे तर, उत्तर प्रदेश सरकार ने त्यांना यश भारती पुरस्कारानेसुद्धा सम्मानीत केले होते. बॉलीवुड मध्ये अनेक सुपरहिट गाणे लिहिणाऱ्या गोपालदास नीरज यांना तीन वेळा फिल्म फेयर अवार्ड मिळाला होता.

 

कवी नीरज यांची काही अजरामर गाणी..

Loading...
Loading...

1 - लिखे जो ख़त तुझे..

2 - आज मधोश हुआ जाए रे..

3 - दिल आज शायर है, ग़म आज नग़मा है..

4 - ए भाई, ज़रा देखके चलो..

5 - शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब..

6 - कारवाँ गुज़र गया गुब्बार देखते रहे

 

कवी नीरज यांचे प्रमुख कविता संग्रह..

संघर्ष (1944)

अन्तर्ध्वनि (1946)

विभावरी (1948)

प्राणगीत (1951)

दर्द दिया है (1956)

बादर बरस गयो (1957)

मुक्तकी (1958)

दो गीत (1958)

नीरज की पाती (1958)

हेही वाचा...

दूध कोंडी फुटली, 25 रूपयांचा दर देणं दूध संघाला बंधनकारक

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

‘जीएसटी’ची 21 ला महत्वपूर्ण बैठक; या वस्तू होऊ शकतात स्वस्त!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 09:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close