PNB Scam : मेहुल चोक्सीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा; एंटीगा सरकारचा मोठा निर्णय

PNB Scam : मेहुल चोक्सीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा; एंटीगा सरकारचा मोठा निर्णय

PNB Scam : एंटीगा सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटींचा चुना लावल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी परदेशी पसार झाले. त्यानंतर मेहुल चोक्सीनं एंटीगामध्ये तर नीरव मोदीनं लंडनमध्ये आश्रय घेतला. सध्या नीरव मोदी लंडनमधील जेलमध्ये आहे. दरम्यान, आता मेहुल चोक्सीला देखील धक्का बसला आहे. कारण, एंटीगामध्ये लपून बसलेल्या मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याचा विचार सध्या एंटीगा सरकार करत आहे. त्यामुळे भारताच्या दबावाला यश येत असून लवकरच मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण भारताकडे केलं जाऊ शकतं. एंटीगाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल. त्यानंतर त्याला भारतात पाठवलं जाईल असं म्हणत एंटीगा कोणत्याही अपराध्याला थारा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

आरोग्याचं दिलं कारण

दरम्यान, मेहुल चोक्सीनं तब्येतीचं कारण देत न्यायालयामध्ये हजर राहण्यास नकार दिला. यावेळी त्यानं मी देशातून पळाळेला नसून उपचारासाठी परदेशात असल्याचं न्यायालयामध्ये म्हटलं होतं. वकीलामार्फत मेहुल चोक्सीनं आपली बाजू न्यायालयापुढे मांडली. दरम्यान, ईडीनं मेहुल चोक्सी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.

कसा झाला Air Strike? मिराजच्या पायलटनं सांगितली कहाणी

नीरव मोदीचं प्रत्यार्पण शक्य?

वेस्टमिनस्टर जेलमध्ये असलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी देखील भारताचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदीला भारतात आणल्यानंतर कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे याची माहिती देखील भारतीय यंत्रणांनी लंडनच्या कोर्टात सादर केली आहे. नीरव मोदीनं केलेला 14 हजार कोटींचा घोटाळा हा देशातील बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. या प्रकरणी त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील मदत केली आहे. त्यांना देखील यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: या देशात 500 हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या