नीरव मोदीची जेलमधील होळी कशी झाली माहीत आहे?

नीरव मोदीची जेलमधील होळी कशी झाली माहीत आहे?

नीरव मोदीची होळी जेलमध्येच गेली. 29 मार्च पर्यंत त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे.

  • Share this:

लंडन, 22 मार्च : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली. यावेळी त्यानं केलेला जामीनासाठीचा अर्ज देखील न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे नीरव मोदीचा जेलमधील मुक्काम वाढला. त्याची होळी देखील जेलमध्येच गेली. विशेष बाब म्हणजे त्याला कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आलेली नाही. सामन्य कैंद्यासोबत त्याला ठेवण्यात आलं. त्यामुळे कैद्यांनी भरलेल्या जेलमध्ये नीरव मोदीचा होळीचा दिवस गेला.

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावल्यानंतर नीरव मोदी भारतातून पसार झाला. त्यानंतर भारतानं त्याचा पासपोर्ट रद्द करत त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. याकाऴात अनेक देशांचा प्रवास करत नीरव मोदी लंडनमध्ये स्थिरावला होता. पण, लंडन पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

बंटी पाटील शिवसेनेचा प्रचार करतात? चंद्रकांत पाटलांकडून जाहीर सभेत भाष्य

29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नीरव मोदीला 29 मार्चपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं. त्यावर आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका नीरव मोदीने केली होती. पण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

VIDEO : भारतीय जवानांनी केला 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरचा खात्मा

First published: March 22, 2019, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading