नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारचा दणका; चार बँक खाती सील

नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारचा दणका; चार बँक खाती सील

PNB Scam : नीरव मोदीची बँक खाती स्वित्झर्लंड सरकारनं सील केली आहेत. त्याला त्या बँक खात्यातून व्यवहार करता येणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींची चुना लावून पळालेल्या नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारनं मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड सरकारनं नीरव मोदीची 4 बँक खाती सिल केली आहेत. त्यामुळे आता या बँक खात्यांवरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा नीरव मोदीला करता येणार नाही. नीरव मोदीच्या 4 बँक खात्यांमध्ये 6 मिलियन डॉलर पैसे होते. सध्या नीरव मोदी लंडनमध्ये लपून बसला असून त्याला वेस्टमिनस्टर पोलिसांनी अटक केली आहे. नीरव मोदीनं जामिनासाठी केलेला अर्ज आतापर्यंत चार वेळा फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील मदत केली होती. त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

BSNL, MTNL बंद होणार? काय आहे सरकारचा प्लॅन

मामा मेहुल चोक्सीची देखील साथ

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावण्यामध्य़े नीरव मोदीला त्याचा मामा मेहुल चोक्सीनं देखील मदत केली होती. मेहुल चोक्सी देखील सध्या एंटिगा या देशात लपून बसला आहे. त्याला देखील भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एंटीगामध्ये लपून बसलेल्या मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याचा विचार सध्या एंटीगा सरकार करत आहे. त्यामुळे भारताच्या दबावाला यश येत असून लवकरच मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण भारताकडे केलं जाऊ शकतं. एंटीगाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल. त्यानंतर त्याला भारतात पाठवलं जाईल असं म्हणत एंटीगा कोणत्याही अपराध्याला थारा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Loading...

मुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार!

आरोग्याचं दिलं कारण

दरम्यान, मेहुल चोक्सीनं तब्येतीचं कारण देत न्यायालयामध्ये हजर राहण्यास नकार दिला. यावेळी त्यानं मी देशातून पळाळेला नसून उपचारासाठी परदेशात असल्याचं न्यायालयामध्ये म्हटलं होतं. वकीलामार्फत मेहुल चोक्सीनं आपली बाजू न्यायालयापुढे मांडली. ईडीनं मेहुल चोक्सी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: विरोधकांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...