PNB Scam : नीरव मोदीनं जेलमध्ये मागितला लॅपटॉप

PNB Scamमधील मुख्य आरोपी नीरव मोदीविरोधात 5000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 09:57 AM IST

PNB Scam : नीरव मोदीनं जेलमध्ये मागितला लॅपटॉप

लंडन, 28 जून : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशी पसार झालेला नीरव मोदी सध्या वेस्टमिंस्टर जेलमध्ये आहे. त्याच्यावर भारतात 5000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. वेस्टमिंस्टर कोर्टानं नीरव मोदीला याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यानं जेलमध्ये लॅपटॉप द्यावा अशी मागणी केली आहे. आपल्यावरील आरोपपत्र वाचण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावा अशी विनंती नीरव मोदीनं वेस्टमिंस्टर कोर्टाला केली आहे. कोर्टानं देखील यावर विचार केला जाईल असं म्हटलं आहे. भारतातून पळाल्यानंतर नीरव मोदीनं लंडनमध्ये आश्रय घेतला. पण, त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या वेस्टमिंस्टर जेलमध्ये आहे. त्यानं केलेला जामीनासाठीचा अर्ज देखील कोर्टानं फेटाळून लावला आहे. नीरव मोदी देश सोडून जाऊ नये म्हणून जामीन नाकारल्याचं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, जामीनावरील पुढील सुनावणी ही 25 जुलै रोजी होणार आहे.

चार बँक खाती सील

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींची चुना लावून पळालेल्या नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारनं मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड सरकारनं नीरव मोदीची 4 बँक खाती सिल केली आहेत. त्यामुळे आता या बँक खात्यांवरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा नीरव मोदीला करता येणार नाही. नीरव मोदीच्या 4 बँक खात्यांमध्ये 6 मिलियन डॉलर पैसे होते.

मेहुल चोक्सीला देखील दणका

एंटीगामध्ये लपून बसलेल्या मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याचा विचार सध्या एंटीगा सरकार करत आहे. त्यामुळे भारताच्या दबावाला यश येत असून लवकरच मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण भारताकडे केलं जाऊ शकतं. एंटीगाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल. त्यानंतर त्याला भारतात पाठवलं जाईल असं म्हणत एंटीगा कोणत्याही अपराध्याला थारा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Loading...

EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...