15 फेब्रुवारी : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर नीरव मोदीच्या काला घोडा इथल्या ऑफिसवर आणि शोरुमवर ईडीनं छापे टाकलेत. एकूण 12 ठिकाणी ईडीचे छापे टाकलेत. नीरव मोदीनं देशातून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
कोण आहे नीरव मोदी?
- मोठा हिरे व्यापारी
- भारतातील 'डायमंड किंग' अशी ओळख
- भारतातील अनेक श्रीमंत व्यक्तींपैकी एक
- फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानी
- 1999 मध्ये फाईव्ह स्टार डायमंड नावाच्या कंपनीची स्थापना
- नीरव मोदी ब्रॅंडचा जगभर दबदबा
- दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत 25 लक्झरी स्टोअर्स
- नीरव मोदीचं सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा