पगार देऊ शकत नाही, नीरव मोदीने कर्मचाऱ्यांनाही सोडलं वाऱ्यावर

२००९ ते २०११ दरम्यान जिंदल हा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत प्रमुख पदावर होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2018 11:40 PM IST

पगार देऊ शकत नाही, नीरव मोदीने कर्मचाऱ्यांनाही सोडलं वाऱ्यावर

21 फेब्रुवारी : पीएनबी बँकेला 11 हजार 400 कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीनं, आता त्याच्या कर्मचाऱ्यात्या पाठीतही खंजीर खुपसलाय. तुमचा पगार देणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही नवीन नोकरी शोधावी अशा आशयाचा ई-मेल नीरव मोदीनं त्याच्या कर्मचाऱ्यांना पाठवलाय.

नीरव मोदीच्या या दगाबाजीमुळे जवळपास 5 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचं समजतंय. दरम्यान पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. काल उशिरा रात्री बँकेचा माजी महाव्यवस्थापक राजेश जिंदलला अटक केली.

२००९ ते २०११ दरम्यान जिंदल हा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत प्रमुख पदावर होता. याआधी सीबीआयने बँकेचे सहा कर्मचारी-अधिकारी आणि नीरव मोदी, मेहुल चोक्सीच्या कंपन्यांमधील पाच जणांना अटक केली आहे.

तर या घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. सीबीआय आणि सरकारला चौकशी करू द्या आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही असा पवित्रा सुप्रीम कोर्टानं घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 11:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...