पीएनबी घोटाळा : नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये असल्याची न्यूज 18 नेटवर्कची माहिती

नीरव मोदीच्या काला घोडा इथल्या ऑफिसवर आणि शोरुमवर ईडीनं छापे टाकलेत. एकूण 12 ठिकाणी ईडीचे छापे टाकलेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2018 01:06 PM IST

पीएनबी घोटाळा : नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये असल्याची न्यूज 18 नेटवर्कची माहिती

15 फेब्रुवारी, मुंबई : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये असल्याची न्यूज 18 नेटवर्कची माहिती आहे. तर नीरव मोदी देश सोडून गेल्याबाबत कुठलीही माहिती नाही, असं गृहमंत्रालयानं म्हटलंय. तसंच नीरव मोदी 5 हजार कोटी परत करायला तयार अशी सूत्रांची माहिती आहे.

त्यानंतर नीरव मोदीच्या काला घोडा इथल्या ऑफिसवर आणि शोरुमवर ईडीनं छापे टाकलेत. एकूण 12 ठिकाणी ईडीचे छापे टाकलेत. नीरव मोदीनं देशातून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

या घोटाळ्यात संशयित असलेले बडे आणि प्रसिद्ध हिरे व्यावसायिक नीरव मोदीसोबत आणखी तीन जण फरार झाले आहेत. यात विजय मल्ल्याचाही मोठा घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावं बँकेने अद्याप जाहीर केलेली नसली तरी दोन दोषी बँक अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. याच घोटाळ्यात ज्वेलर्स नीरव मोदी यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार नीरव मोदी असल्याचंही समतंय. बँकेने या घोटाळ्याविषयी मुंबई शेअर बाजाराला माहिती दिली आहे.

मुंबईतील एका शाखेतून ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी हा बेकायदा व्यवहार होत होता. घोटाळ्याची ही रक्कम बॅंकेच्या एकूण बाजार मुल्याच्या (मार्केट कॅपिटलायझेशन) जवळपास एक तृतियांश आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारात बँकेच्या शेअर्सना 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकांनाही त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती व्यक्त होतेय.

Loading...

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार पंजाब नॅशनल बॅंकेचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रूपये आहे आणि त्यांनी जवळपास 4.5 लाख कोटी रूपये मार्केटमध्ये कर्ज दिलं आहे. बॅंकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणुकदारांना एक दिवसात जवळपास 3 हजार कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

पीएनबी घोटाळा?

असा झाला गैरव्यवहार

- पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

- सुमारे ११,४२७ कोटी रुपये संबंधितांनी विदेशात राहून वळवले

- परदेशात पेमेंट करताना स्विफ्ट खात्याचा वापर

- आयातीचा व्यवहार दाखवला पण प्रत्यक्षात झाला नाही

- नीरव मोदीसह तीन सहकाऱ्यांकडून 3 कंपन्यांद्वारे घोटाळा

- बँकेकडून संशयितांच्या नावाचा उल्लेख नाही

- बँकेतील आधीच्या २८0 कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदीचे नाव

- नीरव मोदीच घोटाळ्याचा सूत्रधार असण्याची दाट शक्यता

- घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात

- अलाहाबाद बँक, युनियन बँक, अ‍ॅक्सिस बँक संकटात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 07:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...