नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर PMOचा मोठा खुलासा, चीनला पुन्हा कडक इशारा

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर PMOचा मोठा खुलासा, चीनला पुन्हा कडक इशारा

गेल्या 60 वर्षांमध्ये चीनने किती जमीन बळकावली आहे ते सर्व देशाला माहित आहे असंही पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 20 जून: चीनसोबतच्या सीमा वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकित केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने मोठा खुलासा केला आहे. भारताच्या हद्दीत सध्या कुणीही आलेलं नाही आणि भारताची पोस्टही कुणी बळकावलेली नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी असं वक्तव्य का केलं असा सवाल विचारला जात होता. त्यावर PMOने हा खुलासा केला आहे. चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल असा इशाराही पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

भारतीय जवानांनी 15 जूनला जे धाडस दाखवलं, जे बलिदान दिलं त्यानंतरच्या परिस्थितीवर पंतप्रधानांनी ते वक्तव्य केलं होतं. भारताचे जवान सीमेचं संरक्षण करत असताना असे वाद निर्माण केले जाऊ नयेत असंही PMOने म्हटलं आहे. भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनी जवानांना भारतीय सैनिकांनी पिटाळून लावलं होतं.

गेल्या 60 वर्षांमध्ये चीनने किती जमीन बळकावली आहे ते सर्व देशाला माहित आहे असंही पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीनंतर चीननं मोठा दावा केला आहे. गलवत खोरं हा आमचाच भाग असून भारतीय सैन्यानं सीमारेषा पार केल्याचा दावा चीननं केला आहे. अनेक वर्षांपासून चीनचे सैनिक या भागात गस्त घातल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर भारतीची कुठलीही पोस्ट चीननं बळकावली नाही असा सर्वात मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत खुलासा केला आहे.

BSF जवानांनी पाकिस्तानचा कट उधळला, शस्त्रास्त्र पुरवणारा ड्रोन केला नष्ट

चीनचं लष्कर भारतीय हद्दीत घुसलं आहे. त्यांनी काही भारताच्या पोस्ट बळकावल्या आहेत असे आरोप होत होते. त्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर सर्वपक्षीय बैठकीत उत्तर दिलं. त्यानंतर काही तासांतच चीनच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. चीनी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्या संकेतस्थळावर एक प्रेस नोट जारी केली असून दावा केला आहे की गलवान खोऱ्याची वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) चीनी बाजूने आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांनी ती पार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.

First published: June 20, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या