Home /News /national /

विजय माल्ल्याला मोठा झटका.. मालमत्ता जप्त होणार, PMLA कोर्टाचा निर्णय

विजय माल्ल्याला मोठा झटका.. मालमत्ता जप्त होणार, PMLA कोर्टाचा निर्णय

नववर्षाच्या पहिल्या दिवशीच स्पेशल कोर्ट पीएमएलएने (PMLA Court) मद्यसम्राट विजय माल्ल्या याला मोठा झटका दिला आहे.

    नवी दिल्ली,1 जानेवारी: नववर्षाच्या पहिल्या दिवशीच स्पेशल कोर्ट पीएमएलएने (PMLA Court) मद्यसम्राट विजय माल्ल्या याला मोठा झटका दिला आहे. भारतीय स्टेट बँकेसह (SBI-State Bank of India) देशातील बॅंकांना विजय माल्ल्याचा जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करून कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्याची परवानगी दिली आहे. यावर विजय माल्ल्याच्या (Vijay Mallya) वकिलांनी आक्षेप घेतला. बॅंकांना ही परवानगी केवळ डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल देऊ शकते, असे माल्ल्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान, स्पेशल पीएमएलए कोर्टाने या निर्णयावर 18 जानेवारीपर्यत स्थगिती आणली आहे. दुसरीकडे, माल्या कोर्टाच्या या आदेशाविरूद्ध मुंबई हायकोर्टात अपील दाखल करू शकतो. मद्यसम्राट विजय माल्याविरूद्ध देशातील बॅंकांनी 9000 कोटी रुपयांना चूना लावल्याप्रकरणी खटला सुरू आहे. याशिवाय माल्ल्यावर मनी लॉन्ड्र‍िंगचाही आरोप आहे. देशातील विविध बॅंकांना चूना लावून विजय माल्ल्याने मार्च 2016 मध्ये लंडन येथे पलायन केले होते. विजय माल्ल्या याला परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास संस्था प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. गेल्या महिन्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी लंडनमधील एका न्यायालयत विजय मल्ल्या याच्या मालमत्ता जप्त करणे आणि दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती. विजय मल्ल्या भारतीय बँकांकडून नऊ हजार करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे घेऊन ब्रिटेन येथे पळ काढला. बँकांनी 2018 मध्ये ही याचिका 2018 मध्ये दाखल केली होती. माल्ल्या याने बँकेकडून कर्ज हे किंगफिंशर एअरलाइन्ससाठी घेतले होते. माल्ल्याने बँकांचे कर्ज बुडवत 2016 मध्ये भारत सोडून पळ काढला होता.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Latest news, Pmla court, SBI, Vijay mallya

    पुढील बातम्या