EXCLUSIVE VIDEO मोदींनी बंगालच्या हिंसाचाराची तुलना केली या राज्याशी

ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालची तुलना कुणाशी केली आहे पाहा व्हिडिओ... मोदींची EXCLUSIVE मुलाखत

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 03:45 PM IST

EXCLUSIVE VIDEO मोदींनी बंगालच्या हिंसाचाराची तुलना केली या राज्याशी

पाालिगंज (बिहार), 15 मे : ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची निवडणूकही बंगालच्या तुलनेत शांतते पार पडली, असं विधान केलं आहे. मोदी यांनी News18 ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. "लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि स्वतःला पक्षीय राजकारणापासून अलिप्त समजणारेही बंगालच्या हिंसाचाराबद्दल काही बोलत नाहीत, हे जास्त चिंताजनक आहे. माझा तिरस्कार करण्याच्या आणि भाजपला विरोध करण्याच्या नादात ते बाकी सगळं माफ करताहेत. यामुळे देशापुढच्या समस्या वाढणार आहेत," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

VIDEO : ...तर मी जिवंत परतलो नसतो, अमित शहांचा खळबजनक दावा

VIDEO : नरेंद्र मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन, सुरक्षा न दिल्याचा आरोप


न्यूज18 च्या अमिताभ सिन्हा आणि ब्रजेशकुमार सिंह यांच्याशी पंतप्रधानांनी बातचीत केली. भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी झाली. हिंसाचारात काहींनी जीवही गमावला. या परिस्थितीची तुलना मोदींनी जम्मू काश्मीरशी केली. "काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांच्या वेळी एकाही निवडणूक केंद्रात हिंसाचार झाल्याचं वृत्त नाही. त्याच वेळी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मात्र मोठा हिंसाचार झाला. माणसं मारली गेली. अनेकांनी घरं त्यांच्या डोळ्यांदेखत जाळली. त्यांना बाजूच्या झारखंड आणि इतर राज्यात पळून जावं लागलं. त्यांची चूक एवढीच होती की, ते निवडणुका जिंकत होते", असं मोदी म्हणाले.

Loading...

"हे सगळं होतंय कारण ममता बॅनर्जींना कुणाचाच धाक राहिलेला नाहीये. नाही भाजपचा, डाव्यांचा किंवा काँग्रेसचा. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं चॉपर उतरू द्यायला परवानगी नाकारली जाते. आमच्या प्रचारसभा घ्यायला परवानगी दिली जात नाही हे त्याचंच लक्षण आहे", मोदी म्हणाले.

#PMToNews18 EXCLUSIVE मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...