राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन

राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीशकुमारांचं अभिनंदन

भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मी नितीश कुमार याचं जाहीर अभिनंदन करतो-पीएम

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जुलै : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. एवढंच नाहीतर खास ट्विट करून त्यांचं जाहीर अभिनंदनही केलंय. भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत दाखवल्याबद्दल मी नितीश कुमार याचं जाहीर अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणालेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि बिहारच्या विकासासाठी आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येऊन लढलं पाहिजे असं सूचक भाष्यही पंतप्रधानांनी केलंय.

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यापासून नितीशकुमारांनी राजकीय फारकत घेतल्यानंतर बिहारमध्ये जेडियू आणि भाजप असं नवं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं. भाजपच्या संसदिय कमिटीने देखील नितीशकुमारांना बाहेरून पाठिंबा देण्यासंबंधी चे स्पष्ट संकेत दिलेत. या दोन्ही राजकीय पक्षांचं संख्याबळ आत्ताच 124च्या आसपास म्हणजेच बहुमतापेक्षा जास्त होतंय. त्यामुळे उद्या पुढेजाऊन हेच नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

काय स्थिती आहे बिहारची?

.....................................

एकूण -243

बहुमत - 122

लालू प्रसाद यादव- 80

नितीशकुमार - 71

काँग्रेस - 27

भाजप- 53

इतर - 5

आता नितीशकुमार-भाजप सरकार?

...........................

बहुमत- 122

नितीशकुमार-71

भाजपा- 53

..................

एकूण- 124

मोदी ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले?

भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई में जुड़ने के लिए नीतीश कुमार जी को बहुत-बहुत बधाई।

सवा सौ करोड़ नागरिक ईमानदारी का स्वागत और समर्थन कर रहे हैं

देश के, विशेष रूप से बिहार के उज्जवल भविष्य के लिए राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर भ्रष्टाचार के खिलाफ एक होकर लड़ना,आज देश और समय की माँग है

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 07:55 PM IST

ताज्या बातम्या