News18 Lokmat

पाच वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार? सर्व देशाचं लागलं लक्ष!

नवीन वर्षांच्या पहिल्याच मुलाखतीत पंतप्रधान मोदी काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 03:14 PM IST

पाच वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार? सर्व देशाचं लागलं लक्ष!

नवी दिल्ली, 1 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने करणार आहेत. ANI या वृत्तसंस्थेला पंतप्रधनांनी मुलाखत दिली असून ती सायंकाळी पाच वाजता दाखविली जाणार आहे. त्यामुळं या मुलाखतीत ते काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.


2019 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष राहणार आहे. मे मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर काही महिन्यांमध्येच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असा भरगच्च कार्यक्रम नव्या वर्षात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच मोठा पराभव स्वीकारावा लागला.Loading...


गेली साडेचारवर्ष भाजपचा विजयाचा अश्वमेघ सुसाट होता. या पराभवाने तो थोडा थांबला. पण त्याचा जोश कायम आहे हे भाजपला आता दाखवून द्यायचं आहे. 2014 सारखी मोदी लहर यावेळी नाही याची भाजपला जाणीव आहे. विधानसभा निवडणुकीतल्या विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.


राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भाजपला आणखी जोर लावावा लागणार आहे. राफेल खरेदीतला भ्रष्टाचार, तिहेरी तलाक, काँग्रेसची महाआघाडी, मित्रपक्षांचं दुरावत जाणं, सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा आरोप, घटनात्मक संस्थांच्या होणाऱ्या खच्चीकरणाचा आरोप, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्यांवर मोदी काय बोलतील याकडे सगळ्या देशांचं लक्ष लागलं आहे.


 


 

VIDEO: 'पहिलं काम आपल्या जातीसाठीच', काँग्रेस मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...