पंतप्रधानांचा मुसलमानांविषयीचा कळवळा खोटा, ओवेसींची टीका

पंतप्रधानांचा मुसलमानांविषयीचा कळवळा खोटा, ओवेसींची टीका

भाजपचे 303 खासदार निवडून आले. यात किती मुस्लिम खासदार आहेत ते त्यांनी सांगावं?

  • Share this:

हैदराबाद 26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDAच्या बैठकीत अल्पसंख्याकांविषयी व्यक्त केलेलं मत हा केवळ देखावा आहे, खोटेपणा आहे अशी टीका एमआयएमचे खासदार असाद्दुद्दीन ओवेसी यांनी केलीय. मुस्लिमांविषयी एवढाच कळवळा होता तर भाजपने किती मुस्लिमांना तिकीटं दिलं ते सांगावं असं आवाहनही त्यांनी पंतप्रधानांना दिलं. या पाच वर्षात अल्पसंख्याकांच्या मनात जी भिती निर्माण करण्यात आली ती काढायची आहे असं मतही पंतप्रधानांनी शनिवारच्या सेंट्रल हॉलमध्ये दिलेल्या भाषणात व्यक्त केलं होतं.

गेल्या काही वर्षात देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भाजपविषयी भिती निर्माण करण्यात आली आहे. मतांच्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी ही भिती निर्माण करण्यात आलीय. यापुढच्या काळात ही भिती त्यांच्या मनातून काढायची आहे असे विचार पंतप्रधानांनी व्यक्त केले होते. आत्तापर्यंत सबका साथ सबका विकास ही घोषणा होती. आता त्यात सबका विश्वास हे नवं धोरण जोडण्यात येत असल्याचंही ते म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या भाषणावर देशभर चर्चा सुरू झाली.

ओवेसी यांनी यावरूनच पंतप्रधानांवर टीका केलीय. ते पुढे म्हणाले, भाजपचे 303 खासदार निवडून आले. यात किती मुस्लिम खासदार आहेत ते त्यांनी सांगावं? पंतप्रधानांनी हा देखावा बंद करावा अशी टीकाही त्यांनी केली.

SC/STमतदारांना हवेत नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप, NDAला लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षा देखील मोठं यश मिळालं. 2014मध्ये भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. NDAची आकडेवारी ही 350 आहे. यामध्ये लक्षवेधी बाब म्हणजे 10 जागी भाजपनं अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे SC, ST मतदारांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचं देखील दिसून येत आहे.

सर्व आकडेवारीचा विचार करता 131 आरक्षित जागांपैकी भाजपला 77 जागांवर विजय मिळाला आहे. तर, 2014मध्ये हाच आकडा 67 होता. भाजपवर पाच वर्षाच्या कार्यकाळात जातीयवादी, दलित विरोधी असल्याचा आरोप लावला गेला. पण, 2019ची आकडेवारी पाहता भाजपवर लावलेले आरोप मतदानातून सिद्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे SC, ST मतदार देखील भाजपच्या पाठिशी असल्याचं म्हणता येईल.

First published: May 26, 2019, 3:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading