नरेंद्र मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानने खुलं केलं हवाई क्षेत्र

पाकिस्तानच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत मिळेल असा अंदाज व्यक्त होतोय.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 07:45 PM IST

नरेंद्र मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानने खुलं केलं हवाई क्षेत्र

नवी दिल्ली, 11 जून : किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. या बैठकीसाठी जाताना पंतप्रधान मोदींचं विमान आता पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार जाऊ शकणार आहे. भारताची विनंती पाकिस्तानने मान्य केलीय. बालकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती. त्यामुळे भारतीय विमानांना वळसा घालून जावं लागतं. मात्र पंतप्रधान मोदींसाठी पाकिस्तानने हा नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला. या आधी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विमानालाही पाकिस्तानने परवानगी दिली होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीदरम्यान हे नेते भेटणार का? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावर भारताने आता अधिकृत भूमिका स्पष्ट केलीय. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची कुठलीही भेट ठरलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा जास्त भारताची काहीही प्रतिक्रिया नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलंय.

SCOच्या बैठकीची माहिती देण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यात सगळ्यांनाच उत्सुकता होती ती मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीबद्दलची. गेली काही वर्ष भारताने दहशतवाद्याच्या मुद्यावरून पाकिस्तानसोबतची चर्चा थांबवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरुपात अधिकृत चर्चा होण्याची शक्यताच नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध जास्तच ताणले गेले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान भेटणार का?

शांतता चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे वारंवार विनवण्या करत आहे. मात्र दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं भारताने ठामपणे सांगितलं होतं. दहशतवादाला खतपाणी देण्याचं पाकिस्तानने बंद केलं याची खात्री झाल्यावरच चर्चा पुन्हा सुरू होईल असं भारताने म्हटलं आहे.

मात्र या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे समोरासमोर येऊ शकतात. त्यावेळी अनौपचारिकपणे दोनही नेत्यांमध्ये काही बोलणं होतं या याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोनही नेते समोरासमोर आले तर सौजन्य म्हणून बोलणं होऊ शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

इम्रान खान यांचा मोदींना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानला भारतासोबत शांतता हवी आहे. पाकिस्तान सर्व विषयांवर चर्चेसाठी तयार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनीही सांगितलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविषयी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद बंद केल्याशीवाय पाकिस्तानसोबत चर्चा करणार नसल्याचं भारताने जाहीर केलंय. त्यामुळे दोन्ही देशांमधली चर्चा सध्या थांबलेले आहे. उरी, पठाणकोट आणि पुलवामातल्या हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले करत पाकिस्तानला दणका दिला होता.

भारतात मोदी पंतप्रधान झाले तरच दोन्ही देशात शांतता निर्माण होऊ शकते असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. त्यामुळे बिश्केकमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close