...नशीब तुम्ही स्कुटरवरून पडल्या नाही, मोदींचा ममतादीदींना टोला

'मला कधी रावण म्हटलं, कधी दानव, तर कधी राक्षस तर कधी गुंडा सुद्धा म्हणण्यात आलं. पण दीदी तुम्हाला इतका राग का येतो'

'मला कधी रावण म्हटलं, कधी दानव, तर कधी राक्षस तर कधी गुंडा सुद्धा म्हणण्यात आलं. पण दीदी तुम्हाला इतका राग का येतो'

  • Share this:
    कोलकाता, 07 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या  (West Bengal Election 2021) प्रचाराला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांनी जोरदार सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत तृणमूल सरकारवर एक-एक आरोप केले आहे. तसंच, 'ममतादीदींनी काही दिवसांपासून स्कुटर चालवून दाखवली होती, त्याची खिल्ली उडवली. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. 'भारत माता की जय, वंदे मातरम्' म्हणत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. 'तुम्ही पूर्ण भारताची बेटी आहात, काही दिवसांपूर्वी तुम्ही स्कुटी सांभाळली. सगळे जण प्रार्थना करत होते की, सगळी काही ठीक व्हावं, तुम्हाला कुठे दुखापत होऊ नये. सुदैवाने तुम्हाला कुठेही दुखापत झाली नाही. जर स्कुटरवर तुम्हाला कुठे दुखापत झाली असती तर ज्या राज्यात स्कुटर तयार झाली त्या राज्याशी तुम्ही दुश्मनी केली असती, असा टोला पंतप्रधान मोदींना लगावला. पोस्ट ऑफिस ग्राहकांना 1 एप्रिलपासून पैसे काढण्यासाठी असा द्यावा लागणार चार्ज 'दीदी तुम्हाला बंगालची जनता एकच प्रश्न विचारत आहे. दीदीच्या भूमिकेत तुम्हाला जनतेनं पाहिलं होतं पण तुम्ही स्वत: ला एकाच पुतण्याची आत्या होण्याचा काम का केले. बंगालमधील लाखो पुतण आहे त्यांच्यासाठी तुम्ही काम का नाही केलं, तुम्ही सुद्धा भाई-भतिजे या काँग्रेसच्या घराणेशाही नातेवाईकवादाला खतपाणी घातले' अशी टीकाही मोदींनी केली. माँ, माटी, माणुष अशी घोषणा ममतादीदींनी दिली होती. मागील 10 वर्षांमध्ये सर्वसामान्य बंगाली लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे का? जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहे का? शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली आहे का? गरीब आणखी गरीब होण्याचे काम तृणमूल सरकारने केले आहे. गुंतवणूक, उद्योग क्षेत्रात कोणतेही परिवर्तन झाले नाही.  माँ, माटी माणुष ची परिस्थितीत बंगालमधील लोकांना माहिती आहे. आज माँवर हल्ले होत आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार झाले आहे, अशी टीका मोदींनी केली. 'मातीवर तृणमूलला बोलण्याचे काम नाही. काळेबाजार, हफ्तेखोर, सिंडिकेटच्या हातात बंगालला सोपवले आहे. बंगालची माणसं आपल्या या भूमीला लुटताना आणि तिचे लचके तोडताना पाहात आहे. त्यामुळे आज प्रत्येक बंगाली ' आर ना यो आर ना यो' अशी घोषणा देत आहे, हा तृणमूल सरकारच्या शेवट आहे, अशी टीकाही मोदींनी केली. भाजपामध्ये प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींचं आव्हान, 'मी खरा...' 'मला कधी रावण म्हटलं,  कधी दानव, तर कधी राक्षस तर कधी गुंडा सुद्धा म्हणण्यात आलं. पण दीदी तुम्हाला इतका राग का येतो. इतका राग चांगला नाही. जर आज बंगालमध्ये कमळ उमलणार आहे, हे तेच चिखल आहे जे तुमच्या पक्षांनी पसरवले आहे. तुम्ही जातीयवाद पसरवला त्यामुळे कमल उमलणार आहे, तुम्ही लोकांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवले म्हणून कमळ उमलणार आहे', असंही मोदींनी ठामपणे सांगितले.
    Published by:sachin Salve
    First published: