PM नरेंद्र मोदींच्या भाचीला भरदिवसा चोरट्यांनी लुटलं, बाईकस्वारांचा PHOTO VIRAL

राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाचीला चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 11:16 AM IST

PM नरेंद्र मोदींच्या भाचीला भरदिवसा चोरट्यांनी लुटलं, बाईकस्वारांचा PHOTO VIRAL

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाची दमयंती मोदींना चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (12 ऑक्टोबर) घडली असून याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सिव्हिली लायन्स पोलीस ठाणे परिसरात दमयंती यांना लुटण्यात आलं. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते अनिल मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटमारीची संपूर्ण घटना गुजराती समाज भवनाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपींचा शोध लागला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावादेखील पोलिसांनी केला आहे.

असा घडला लुटमारीचा प्रकार

अमृतसरहून दिल्लीमध्ये दाखल झालेल्या दमयंती मोदी यांची गुजरात समाज भवन परिसरात काही जणांसोबत झटापट झाली. दमयंती मोदी रिक्षामधून उतरताच बाईकवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावली आणि काही कळण्याच्या आतच दोघंही फरार झाले. दमयंती यांच्या पर्समध्ये जवळपास 56 हजार रुपये आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रं होती. सिव्हिल लायन्स हा दिल्लीतील व्हीव्हीआयपी परिसर म्हणून ओळखला जातो. घटनास्थळावरून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान देखील काही अंतरावरच आहे. अशातच दिवसाढवळ्याच एका महिलेला चोरट्यांनी लुटल्यानं येथील नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(वाचा : अमानूष! महिलेला जिवंत जाळल्याचा VIDEO VIRAL, चार आरोपींना अटक)

Loading...

(वाचा :पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?)

घटनेचं राजकारण

पंतप्रधान मोदींच्या भाचीसोबत झालेल्या लुटमारीच्या प्रकरणाचं राजकारण सुरू करण्यात आलं आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'राजधानी दिल्लीत लुटमारी, अंगावरील दागिने हिसकावणे यांसारख्या घटना वारंवार घडत आहे. यासाठी 90 टक्के बेकायदेशीररित्या घुसखोर जबाबदार आहेत'. या घुसखोरांना मुख्यमंत्री संरक्षण देण्याचं काम करत आहेत, असा आरोपही तिवारींनी केला.

(वाचा : बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप)

मुंबईच्या चर्नीरोडमध्ये रहिवासी इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीचा भीषण LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 08:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...