सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 02:38 PM IST

सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : राजस्थानमधल्या चुरू इथं झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले देश सुरक्षीत हातात आहे याचा विश्वास ठेवा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नही मिटने दूँगा असं सांगत पंतप्रधनांनी देशातल्या वीर जवानांना नमन केलं. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान बोलणार असल्याने काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. भाषणाच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी भारत माता की जय अशी घोषणा दिली आणि लोकांकडूनही बदवून घेतली. त्यानंतर चार कवितेच्या ओळीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा।


मैं देश नहीं रुकने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा।।

Loading...


मेरा वचन है भारत मां को तेरा शीश नहीं झुकने दूंगा।


सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा 


https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modis-first-reaction-on-air-strickak-345472.html




असा झाला निर्णय


पुलवामाच्या भीषण आत्मघातकी हल्ला झाल्यानंतर भारताने दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ल्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्जिकल स्ट्राईक एकदा झाल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणं फायद्याचं नव्हतं. त्यामुळे हवाई हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला.


14 फेब्रुवारीला पुलवामाचा हल्ला झाला. त्यानंतर दिल्लीत परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री महत्त्वाची बैठक घेतली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीनही सेना दलांचे प्रमुख, RAW आणि IB या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन  काय प्रत्युत्तर देता येईल असा प्रश्न पंतप्रधानांनी तीनही सेना प्रमुखांना विचारला.


तीनही दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना त्यांचं मत सांगितलं आणि नंतर दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला. अतिशय गुप्तपणे हे ऑपरेशन आखण्यात आलं. नंतर पंतप्रधानांनी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी दहशतवाद्यांना मोठं मोल चुकवावं लागेल असा इशारा दिला होता.


ऑपरेशन Air Strike



NSA अजित डोवाल यांनी या कारवाईचं समन्वयन केलं. हवाई दलाचे प्रमुख बिरेंद्र सिंग धनोआ यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार केली. कारवाईची प्रत्येक गोष्ट डोवाल पंतप्रधानांना देत होते. रात्रंदिवस संरक्षण मंत्रालयात बैठका सुरू होत्या. अज्ञात ठिकाणी सर्व योजना तयार करण्यात येत होती. पंतप्रधानांसह फक्त मोजक्या तीन मंत्र्यांना या कारवाईची माहिती होती.


भारत काही करावाई करणार आहे अशी माहिती NSA अजित डोवाल यांनी अमेरिका, फ्रान्स, रशीया, ब्रिटन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आणि विश्वासात घेतलं. भारताने कारवाई केली तर त्या देशांनी समर्थन द्यावं अशी पूर्ण व्यवस्था भारताने केली होती.


दहशतवाद्यांचे तळ निश्चित करणं हे भारतापुढे सर्वात मोठं आव्हान होतं. कारण सीमेजवळच्या सर्व तळ पाकिस्तानने रिकामे केले होते. त्यामुळे गुप्तचर संस्था आणि उपग्रहांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमधलं बालाकोट हे ठिकाण निश्चित करण्यात आलं.


पाकिस्तान काय प्रत्युत्तर देऊ शकते याचा अंदाज लक्षात घेऊन पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. पाकिस्तान थोडा गाफिल राहावा यासाठी पंतप्रधान देशभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते. राजकीय सभा आणि कार्यक्रम सुरू असल्याने भारत पूर्वपदावर येत आहे असा समज पाकिस्तानचा होत होता.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...