News18 Lokmat

राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातच मोदींचा राफेल स्ट्राईक

आमचं सरकारच उडवणार पहिलं राफेल विमान, पंतप्रधान मोदींचा अमेठीतूनच राहुल गांधींवर निशाणा

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 08:51 PM IST

राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यातच मोदींचा राफेल स्ट्राईक

अमेठी,03 मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक वार करत म्हटलं की, काही लोक येता-जाता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन इंदूरसंदर्भात भाषण देत फिरत आहेत. पण हा मोदी आहे ज्याने 'मेड इन अमेठी' चे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

अमेठीमध्ये अत्याधुनिक एके-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी (3मार्च)केली. येथे  रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसंच विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना 'मेड इन अमेठी' मुद्यावर राहुल गांधींना सणसणीत टोला हाणला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''अत्याधुनिक रायफल एके-203 रायफलची अमेठीत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प 8-9 वर्षापूर्वीच सुरू होणं अपेक्षित होते. अत्याधुनिक रायफल बनवण्यासाठी कोरबामध्ये कारखान्याची स्थापना करण्यात आली होती, पण त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला नाही. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन तीन वर्ष लोटली, पण येथे कोणत्या शस्त्राची निर्मिती केली जाईल?, याबाबत पूर्वीचे सरकार ठोस निर्णय घेऊ शकले नाही''.

'अमेठीतील युवा पिढीचा विश्वासघात'

''1500 लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी (काँग्रेस )दिले होते. पण अमेठीतील लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली. अमेठीतील युवा पिढीचा विश्वासघात करणारे जगभरात रोजगारासंबंधीची भाषण देत फिरत आहेत'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला.

Loading...

'सबका साथ-सबका विकास'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे असेही म्हटलं की, 2014मध्ये आम्ही 'सबका साथ-सबका विकास'चा नारा दिला होता. आज अमेठी याचे उदाहरण आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले, तेही आमचे आहेत आणि ज्यांनी नाही दिले ती माणसंदेखील आमचीच आहेत.

आमचे सरकारच उडवणार पहिले राफेल विमान

राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की,  ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला.

मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला चांगलेच खडेबोल सुनावलेत.

'अमेठीसाठी 538 कोटी रुपयांचे प्रकल्प'

आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेठीमध्ये 538 कोटी रुपयांचे प्रकल्प लाँच केले. गेल्या पाच वर्षात स्मृती इराणींनी येथे प्रचंड मेहनत केले, भरपूर काम केले आहे. निवडणुकीत ज्या पक्षाचा येथे विजय झाला आहे त्यांच्या तुलनेत इराणींनी या मतदारसंघात अधिक काम केले आहे. त्यामुळे असे वाटतच नाही की, या मतदारसंघातून त्या जिंकल्या नव्हत्याच.


Air Strike मध्ये मसूद अझहरचा मृत्यू? पाहा निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचं विश्लेषणबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...