लोकसभेची लढाई : 42 प्रश्न 95 मिनिटं, काय बोलणार नरेंद्र मोदी?

लोकसभेची लढाई : 42 प्रश्न 95 मिनिटं, काय बोलणार नरेंद्र मोदी?

नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने करणार आहेत त्यामुळे ते काय बोलतील याची उत्सुकत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. थोड्याच वेळात म्हणजे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता ANI ने घेलेली ही मुलाखत प्रसारीत होणार आहे. प्रदीर्घ अशी ही मुलाखत असून त्यात मोदींना 42 विचारण्यात आलेत.


तर तब्बल 95 मिनिटं ही मुलाखत चालली अशी माहिती ANI ने ट्विटरवर दिली आहे. गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने करणार आहेत. त्यामुळं या मुलाखतीत ते काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.


2019 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष राहणार आहे. मे मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर काही महिन्यांमध्येच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असा भरगच्च कार्यक्रम नव्या वर्षात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच मोठा पराभव स्वीकारावा लागला.


गेली साडेचारवर्ष भाजपचा विजयाचा अश्वमेघ सुसाट होता. या पराभवाने तो थोडा थांबला. पण त्याचा जोश कायम आहे हे भाजपला आता दाखवून द्यायचं आहे. 2014 सारखी मोदी लहर यावेळी नाही याची भाजपला जाणीव आहे. विधानसभा निवडणुकीतल्या विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.


राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भाजपला आणखी जोर लावावा लागणार आहे. राफेल खरेदीतला भ्रष्टाचार, तिहेरी तलाक, काँग्रेसची महाआघाडी, मित्रपक्षांचं दुरावत जाणं, सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा आरोप, घटनात्मक संस्थांच्या होणाऱ्या खच्चीकरणाचा आरोप, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्यांवर मोदी काय बोलतील याकडे सगळ्या देशांचं लक्ष लागलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या