राज्यातला सत्तेचा पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार

राज्यातला सत्तेचा पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार

राज्यातला सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर आला असताना महाराष्ट्रासारखं राज्य हातातून भाजप कधीच सोडणार नाही, त्यामुळे पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास 5 नोव्हेंबर : महाराष्ट्रातला सत्तेचा पेच आता निर्णायाक टप्प्यावर आलाय. भाजप आणि शिवसेनेतली कोंडी कायम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढतेय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर परिस्थिती आणखी बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत नवीन सरकार स्थापन करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कोंडी फोडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. थायलंडमधल्या 'आरसेप' परिषदेला उपस्थित राहून पंतप्रधान रात्री उशीरा दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे आज दिल्लीतून मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिवसभर दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नितीन गडकरी आणि इतर नेत्यांची भेट घेऊन राज्यातल्या घडमोडींवर चर्चा केली. मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार असंही बोललं जात होतं. मात्र ते रात्रीच मुंबईत दाखल झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले की ते पुन्हा एकदा सोनिया गांधींना भेटणार असून त्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. याचा अर्थ कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे असे संकेत मिळताहेत. त्यामुळे सोनिया गांधीं आणि पवारांच्या दुसऱ्या भेटीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय हा दिल्लीत होईल हे स्पष्ट झालंय.

महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, जनतेच्या मनाप्रमाणेच होईल- संजय राऊत

आज काय म्हणाले संजय राऊत?

राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष हा गोंधळ नसून ही न्याय आणि सत्याची लढाई आहे. महाराष्ट्रातील राजकीय 'ग्रहण' लवकरच निवळणार असून महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाप्रमाणेच निर्णय होईल, असा पुनरच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल. संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार येणार? पवारांच्या दिल्ली वारीनंतर चर्चेला उधाण

शिवसेनेचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमिवरच शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वत: आम्हाला राज्यापालांकडे पाठवले होते. राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, काय घडतंय पडद्यावरचं आणि पडद्यामागचं हे राज्यपालांना सांगणे शिवसेनेचे कर्तव्यच असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 5, 2019, 11:49 AM IST

ताज्या बातम्या