सुवर्णसंधी! चांद्रयान - 2 चं लँडिंग पाहतानाचा तुमचा फोटो पंतप्रधान करणार शेअर

सुवर्णसंधी! चांद्रयान - 2 चं लँडिंग पाहतानाचा तुमचा फोटो पंतप्रधान करणार शेअर

चांद्रयान -2 च्या लँडिंगबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या लँडिंगचं लाइव्ह प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये पाहणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे सगळ्या देशवासियांनी साक्षीदार व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : चांद्रयान -2 च्या लँडिंगबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या लँडिंगचं लाइव्ह प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये पाहणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे सगळ्या देशवासियांनी साक्षीदार व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी देशवासियांना त्यांच्या ट्विटर अकाउंटवर झळकण्याची संधी दिली आहे. जे लोक हे लँडिंग पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतील त्यातले काही फोटो स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी रिट्विट करणार आहेत.

रायगडावर हेरिटेज हॉटेल होऊ शकतं? वादग्रस्त निर्णयावर सरकारची पहिली प्रतिक्रिया

22 जुलैला चांद्रयान -2 यानाने उड्डाण केलं. त्यानंतर मी या मोहिमेचे टप्पे पाहत आलो आहे. आता भारतीय शास्त्रज्ञांची ही झेप पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. इस्रोची ही मोहीम प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाची आहे, असंही त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

===========================================================================================================

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत; काय म्हणाले छगन भुजबळ?

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-405306" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDA1MzA2/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 04:45 PM IST

ताज्या बातम्या