मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वदेशी कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या 3 कंपन्यांसोबत पंतप्रधानांची आज बैठक; जाणून घ्या कोणत्या आहेत या कंपनी

स्वदेशी कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या 3 कंपन्यांसोबत पंतप्रधानांची आज बैठक; जाणून घ्या कोणत्या आहेत या कंपनी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांचा दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा सोमवारीही पंतप्रधान कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या तीन कंपन्यांशी बैठक करणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत या कंपनी...

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : देशासह जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. अनेक देशात पुन्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. भारतातही काही शहरात नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. यादरम्यान सर्वच जण कोरोना व्हायरसवरील वॅक्सिनच्या प्रतिक्षेत आहेत. जगभरातील अनेक कंपन्या कोरोना वॅक्सिन विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांचा दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा सोमवारीही पंतप्रधान कोरोना वॅक्सिन बनवणाऱ्या तीन कंपन्यांशी बैठक करणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत या कंपनी -

जेनोवा बायोफार्मास्‍यूटिकल्‍स (Gennova Biopharmaceuticals) -

जेनोवा बायोफार्मास्‍यूटिकल्‍स ही कंपनी पुण्यात आहे. ही कंपनी लवकरच एमआरएनए वॅक्सिनची ह्यूमन ट्रायल सुरू करू शकते. आरएनए वॅक्सिन एखाद्या आजाराच्या एंटीजनसाठी एमआरएनए सिक्वेंस कोडद्वारे तयार केली जाते. एकदा एंटीजन स्वत:च शरीरात विकसित झाल्यास, ते इम्युन सिस्टमद्वारा ओळखलं जातं आणि आजाराशी लढू लागतं.

कंपनी डिसेंबर महिन्यात या वॅक्सिनची ह्यूमन ट्रायल करण्याची शक्यता आहे. हे वॅक्सिन सीएटल एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनसह मिळून बनवण्यात येत आहे. त्याशिवाय याचं फंडिंग सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून केलं जात आहे. एमआरएनए वॅक्सिन सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय कमी तापमानाची आवश्यकता असते. परंतु हे वॅक्सिन 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानावरही काम करू शकत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

(वाचा - धक्कादायक! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यामुळे, आई आणि बहिणीची हत्या)

डॉ. रेड्डीज लॅब (Dr. Reddy's Lab) -

डॉ. रेड्डीज लॅब रशियातील कोरोना वॅक्सिन स्पूतनिकचं (sputnik)ट्रायल करत आहे. हे वॅक्सिन भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी पुढे जात आहे. रशियाने, त्यांनी तयार केलेलं हे वॅक्सिन 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. या वॅक्सिनचं ट्रायल रशियन डायरेक्ट इंव्हेस्टमेंट फंडचा भाग आहे. स्पूतनिक कोरोना वॅक्सिन, गॅमेलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीकडून विकसित करण्यात आली आहे. भारतातील औषध निर्माता कंपनी हेटेरोने या वॅक्सिनचे 10 कोटी डोस तयार करण्याची योजना आखली आहे. याबाबत रशियन डायरेक्ट इंव्हेस्टमेंट फंडनेही अधिकृत घोषणा केली आहे.

(वाचा - रेल्वे स्थानकांत केवळ कुल्हडमधूनच चहा मिळणार; रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा)

या वॅक्सिनचं उत्पादन 2021 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. हे वॅक्सिन एडनोव्हायरल वेक्टरद्वारे तयार करण्यात आलं आहे. या पद्धतीत तयार करण्यात आलेले एडनोव्हायरल वेक्टर आपल्या शरीरात कोरोना व्हायरसच्या एका जीनमधून जातात आणि पेशींना याची माहिती होते. त्यानंतर त्याच्याविरोधात प्रोटीन बनून ते प्रतिकार करतात.

बायोलॉजिकल ई वॅक्सिन (Biological E) -

ही कंपनी हैदराबादमध्ये आहे. सध्या या वॅक्सिनचं ट्रायल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहे. या कंपनीच्या वॅक्सिनमध्ये अमेरिकेच्या बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनकडून लायसन्स केलेला एंटीजन सामिल आहे. तसंच यात खास adjuvant ही आहे. adjuvant म्हणजे एखाद्या रोगावर दिलेल्या औषधाची क्रियाशिलता वाढवण्यासाठी वापरलेला पदार्थ असतो. adjuvant मध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे तत्व असतात.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Pm modi