25 सप्टेंबर : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिलाय. गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सौभाग्य योजना लाँच केली आहे.
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही योजना 2019 च्या निवडणुकीच्या पहिले पूर्ण केली जाणार आहे. सौभाग्य योजनेवर 16 हजार कोटी खर्च होणार आहे. पण या योजनेतून शहरं आणि गावांमधील गरिबांना सौभाग्य योजनेचा फायदा होणार आहे. गरिबांचा स्वप्न हेच सरकारचं स्वप्न आहे असा नारा यावेळी मोदींनी दिला. तसंच मागील वर्षी याच दिवशी गरीब कल्याण वर्ष सुरू करण्यात आले होते. याअंतर्गत 30 कोटी गरिबांची बँक खाती उघडण्यात आलीये असंही मोदी म्हणाले.
"मी सुद्धा कंदिलाच्या उजेडाखाली अभ्यास केला"
मी सुद्धा कंदिलाच्या उजेडाखाली अभ्यास केलाय. आज सुद्धा चार कोटी मुलं कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताय. सौभाग्य योजनेतून सरकार गरिबांना मोफत वीज कनेक्शन पुरवणार आहे.
एलईडी लाईट, एक पंखा आणि एक बॅटरी मिळणार
या योजनेतून देशातील तीन गरीब जनतेला याचा फायदा होणार आहे. योजनेअंतर्गत मोफत कनेक्शनसह पाच एलईटी बल्ब, एक पंखा आणि एक बॅटरी दिली जाणार आहे अशी घोषणाही मोदींनी केली.
ग्रामीण भागात 14 कोटी खर्च
ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत 14025 कोटी खर्च होणार आहे. तर शहरी भागात 1732 कोटी खर्च होणार आहे. यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. सरकार पाच वर्ष वीजच्या देखभालीचा खर्च उचलणार आहे अशी माहितीही मोदींनी दिली.
या राज्यातील लोकांना मिळणार मदत
पंतप्रधान सहज वीज हर घर योजना (सौभाग्य) अंतर्गत बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, पूर्वोत्तर राज्य आणि राजस्थानमधील प्रत्येक घरात वीज पुरवली जाणार आहे.
Prominent points of Pradhan Mantri Sahaj Bijli Yojna-Saubhagya launched by PM Modi pic.twitter.com/F6CDWU5iWX
— ANI (@ANI) September 25, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा