रेल्वेला मिळालं सर्वात शक्तिशाली इंजिन, 12 हजार हॉर्सपॉवरची क्षमता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे इंजिनला हिरवी झेंडी दाखवली. 12000 हॉर्सपावर क्षमतेचं हे इंजिन असून ताशी 120 किमी त्याचा वेग असून 6 हजार टन वजन खेचून नेण्याची त्याची क्षमता आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2018 05:51 PM IST

रेल्वेला मिळालं सर्वात शक्तिशाली इंजिन, 12 हजार हॉर्सपॉवरची क्षमता

पाटणा,ता.09 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे इंजिनला हिरवी झेंडी दाखवली. 12000 हॉर्सपावर क्षमतेचं हे इंजिन असून ताशी 120 किमी त्याचा वेग असून 6 हजार टन वजन खेचून नेण्याची त्याची क्षमता आहे. फ्रान्सच्या एल्सटॉम या कंपनीच्या मदतीनं बिहारमधल्या मधेपुरातल्या कारखाण्यात हे इंजिन तयार करण्यात येणार आहे. अशा क्षमतेचं इंजिन चालवणारा भारत हा जगातला पाचवा देश बनलाय. या आधी रशिया, चीन, जर्मनी आणि स्विडनमध्ये अशा प्रकारची इंजिन चालवली जात आहेत.

भारताच्या गरजा आणि वातावरण लक्षात घेऊन या इंजिनाची रचना करण्यात आली असून अती थंड आणि गरम वातावरणातही हे इंजिन उत्तमपणे कार्य करू शकते. हे इंजिन तयार करताना पर्यावरणाचा विचार करण्यात आला आहे. यात एलईडी लाईट्स आणि पुनर्रवापर करणाऱ्या टेक्नॉलॉजिचा उपयोग करण्यात आला असून त्यामुळं 87 टक्के ऊर्जा बचत होऊ शकते.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...