...तर मोदी आणखी मोठे होतील, सामनातून शिवसेनेचा पंतप्रधानांना सल्ला

...तर मोदी आणखी मोठे होतील, सामनातून शिवसेनेचा पंतप्रधानांना सल्ला

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Famer Protest) शिवसेनेनं (Shivsena) मोदींना सल्ला दिला आहे. 'कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी (PM Narendra Modi) आज आहेत त्याच्यापेक्षा मोठे होतील', असं संजय राऊत सामनाच्या अग्रलेखातून म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Famer Protest) शिवसेनेनं (Shivsena) मोदींना सल्ला दिला आहे. 'कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी (PM Narendra Modi) आज आहेत त्याच्यापेक्षा मोठे होतील', असं संजय राऊत सामनाच्या अग्रलेखातून म्हणाले आहेत. 'वातावरण जास्त बिघडू नये, असं सरकारला वाटत असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत. आतापर्यंत 60-65 शेतकऱ्यांनी आंदोलनात बलिदान दिलं आहे. एवढं कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं', असं सामना मध्ये लिहिण्यात आलं आहे.

'सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तात्पुरती स्थगिती देत चार सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली, पण हे चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याची वकिली करत होते, त्यामुळे शेतकरी संघटनांनी झिडकारलं आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलनात खलिस्तानवाद्यांनी शिरकाव केल्याचं सरकारचं सर्वोच्च न्यायालयातलं वक्तव्य धक्कादायक आहे. आंदोलक सरकारचं ऐकत नाहीत, म्हणून त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवून काय साध्य करणार आहात? चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले, त्यांच्या माघारीची चर्चा सुरू आहे, पण शेतकरी आंदोलकांना खलिस्तानवादी ठरवून बदनाम केलं जात आहे. जर आंदोलनात खलिस्तानवादी घुसले असतील, तर हे सरकारचंच अपयश आहे', अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'शेतकरी सर्वोच्च न्यायालयरूपी भगवंताचेही ऐकायला तयार नाहीत, कारण त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हाच परमेश्वर आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणत त्यांच्याचसाठी न्यायालयात याचना करायची, हे दुटप्पी धोरण कसले? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लाखो शेतकरी मान्य करणार नसतील, तर त्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणार काय? त्यांच्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला दाखल करणार का?' असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 'वातावरण बिघडू नये, असं सरकारला वाटत असेल, तर सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून कायदे रद्द केले पाहिजेत,' अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे.

Published by: Shreyas
First published: January 14, 2021, 7:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading