Modi सरकारकडून नववर्षाची खास भेट, शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटी जमा करणार

Modi सरकारकडून नववर्षाची खास भेट, शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटी जमा करणार

Modi सरकारकडून शेतकऱ्यांना नव्या वर्षाची खास भेट. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे.

  • Share this:

बंगळुरू, 02 जानेवारी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षाची शेतकऱ्यांना खास भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी तुमकूर इथे पंतप्रधान किसान योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा कोटी शेतकऱ्यांमध्ये 12,000 कोटींची रक्कम खात्यात जमा करणार आहेत. डिसेंबर महिन्यातील 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आला नसल्यानं नव्या वर्षात उरलेल्या रकमेसह खात्यात पैसे जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार असल्यानं त्याचा फायदा साडेसहा कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तुमकुर इथल्या श्री सिद्धगंगा मठतील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा (BS Yediyurappa) श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी जनतेसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी कर्नाटकात PM किसान आवास योजनेबाबद मोठी घोषणा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

सरकारकडून 1 ते 29 डिसेंबर आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडण्याची मुदत देण्यात आली होती. 29 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 9.2 कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारपर्यंत पोहोचू शकली आहे. 2 जानेवारीला केंद्र सरकारकडून साडेसहा कोटी शेतकऱ्यांमध्ये एकूण 12 हजार कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकऱ्यांना या योजनेची मदत होणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 2 कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात सरकारला यश आलेले आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील 45 हजार कोटींचे वाटप करण्यात आले असून, आता जानेवारीत 12 हजार कोटींचे वाटप करण्यात येईल.

अंतरिम अर्थसंकल्पात डायरेक्ट-बेनेफिट ट्रांसफर स्कीम जाहीर करण्यात आली. या योजनेत तीन हप्त्यात 2 हजार दशलक्ष लघु व सीमांत शेतकर्‍यांना (ज्यांची 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. 2,000-2,000 वर्षाकाठी 6,000 रुपयांची रक्कम देण्याची योजना होती. मात्र, यंदा दुसर्‍या टर्मसाठी सत्तेत आल्यानंतर सरकारने त्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचे ठरवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pm modi
First Published: Jan 2, 2020 08:13 AM IST

ताज्या बातम्या