Home /News /national /

VIDEO...तर भारतीय लष्कर पाकिस्तानला दहा दिवसांत पराभूत करेल - PM मोदी

VIDEO...तर भारतीय लष्कर पाकिस्तानला दहा दिवसांत पराभूत करेल - PM मोदी

भारताचा शेजारी असलेल्या देशाने भारताविरुद्ध छुपं युद्ध सुरु केलंय. त्यात त्याचा पराभव झाला.

    नवी दिल्ली 28 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातून आलेल्या NCC कॅडेट्सला संबोधीत केलं. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिना निमित्त हे कॅडेट्स दिल्लीत आले होते. त्या सगळ्या तरुणांसमोर बोलताना पंतप्रधानांनी CAAवरून देशभर सुरु असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध छेडलेल्या कारवाईचाही उल्लेख केला. भारताचा शेजारी असलेल्या देशाने भारताविरुद्ध छुपं युद्ध सुरु केलंय. त्यात त्याचा पराभव झाला. तो देश भारताविरुद्ध दोन छुपी युद्ध लढला त्यातही त्याचा पराभव झाला असंही पंतप्रधानांनी पाकिस्तानचं नाव न घेता टीका केली. पंतप्रधान पुढे म्हणाले, भरातीय लष्कारने मनात आणलं तर तो दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या या देशाचा 10 दिवसांमध्ये पराभव करू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. आधीच्या अनेक सरकारांनी नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत येवू दिलं नाही. फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठी निर्णय घेतले गेले नाही अशी टीकाही पंतप्रधानांनी केली. दरम्यान,  CAA आणि NRCच्या विरोधात दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये निदर्शने सुरु आहेत. मुस्लिम महिला गेल्या 45 दिवसांपासून तिथे ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्या निदर्शकांसमोर बोलतानाचा एक वादग्रस्त भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जेएनयुचा विद्यार्थी शरजील इमाम याचा तो व्हिडीओ होता आणि त्यात तो आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणानंतर शरजील हा फरार होता. पोलिसांनी त्याला आज बिहारमध्ये अटक केलीय. बिहारच्या जेहानाबादमध्ये दिल्ली पोलिसांनी कारवाई करत शरजीलला ताब्यात घेतलं. त्याचं भाषण अतिशय वादग्रस्त ठरलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: India- pakistan, Narendra modi

    पुढील बातम्या