मराठी बातम्या /बातम्या /देश /अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिबमध्ये पोहोचले PM नरेंद्र मोदी, पाहा VIDEO

अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिबमध्ये पोहोचले PM नरेंद्र मोदी, पाहा VIDEO

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अचानक गुरुद्वारा श्री शीशगंज साहिब (Sheesh Ganj Sahib Gurudwara) ला आज भेट दिली. या दरम्यान त्यांच्या बरोबर कोणती विशेष सुरक्षा नव्हती.

नवी दिल्ली, 01 मे: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अचानक गुरुद्वारा श्री शीश गंज साहिब (Sheesh Ganj Sahib Gurudwara) ला आज भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी काहीवेळ याठिकाणी प्रार्थना केली आणि काही वेळ त्या ठिकाणी घालवला. या दरम्यान त्यांच्या बरोबर कोणती विशेष सुरक्षा नव्हती. त्याचप्रमाणे कोणत्याही वेगळ्या सुरक्षित मार्गाने ते त्याठिकाणी पोहोचले नव्हते.

नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वच्या समापन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गुरुद्वारा श्री शीशगंज साहिब येथे पोहोचले. सुरुवातील अशी बातमी आली होती की, पीएम मोदी श्री गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वनिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करतील.

या भव्य स्मारकामध्ये श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि बलिदानाची सविस्तर माहिती असणार आहे. या स्मारकाची उंची 40 फूट आणि रुंदी 25 फूट, तर जाडी सात फूट आहे.

(हे वाचा-भारतातून येणाऱ्या प्रवाशांना नो एन्ट्री, कोरोना प्रसारादरम्यान अमेरिकेचा निर्णय)

तज्ञांच्या मते, ज्याठिकाणी शीशगंज गुरुद्वारा बांधण्यात आले आहे त्याठिकाणी मुगल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार श्री गुरू तेग बहादूर यांच्यासह त्यांच्या शिष्यांचा गळा एका जल्लादाने कापला होता. औरंगजेबाकडून धर्म परिवर्तनच्या नावाखाली अनेक प्रलोभनं देखील देण्यात आली होती आणि नंतर गुरु तेग बहादूर यांच्यासमोरच त्यांच्या शिष्यांना ठार करण्यात आले होते. यामुळे, ही ऐतिहासिक गुरुद्वारा जगभरातील लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे

First published:
top videos

    Tags: PM narendra modi