कोरोनाविरुद्धच्या लढाईत PM मोदी अ‍ॅक्शनमध्ये, औषध कंपन्यांनसाठी 14 हजार कोटींचं पॅकेज

कोरोनाविरुद्धच्या लढाईत PM मोदी अ‍ॅक्शनमध्ये, औषध कंपन्यांनसाठी 14 हजार कोटींचं पॅकेज

कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी लागणाऱ्या किटची सरकारला गरज असून त्याची युद्ध पातळीवर निर्मिती करा असा आग्रह त्यांनी धरला.

  • Share this:

नवी दिल्ली 21 मार्च : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आणखी सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी देशातल्या औषध निर्मात्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी यात पूर्ण क्षमतेने मदत करावी, सरकार त्यांना लागेल ती मदत करायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या टेस्ट करण्यासाठी लागणाऱ्या किटची सरकारला गरज असून त्याची युद्ध पातळीवर निर्मिती करा असा आग्रह त्यांनी धरला. सरकारने या आधीच 14 हजार कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केल्याचं त्यांनी सांगितलं.

जास्तित जास्त औषधं बाजारात कशी उपलब्ध होतील त्याकडे लक्ष द्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीने संशोधन करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या भितीमुळे शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणांनी आता घराची वाट धरली आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये रोजगारासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले आहेत. कोरोनाचं सावट आणि लॉकडाऊनची भिती यामुळे त्यांनी गावी परतण्याची निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती निर्माण झालीय. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे जाणाऱ्या सर्वांना प्रवास न करता ज्या शहरांमध्ये आहात तिथेच थांबण्याची विनंती केलीय.

पंतप्रधान म्हणाले, असं केल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती आहे. त्याचबरोबर तुमच्या गावीही धोका वाढतो. यामुळे तुमचे आई वडिलही चिंतेत पडतील त्यामुळे जिथे आहात तिथेच राहा अशी विनंती त्यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे रविवारी ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली आहे. नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

 

First Published: Mar 21, 2020 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading