लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात केलं ट्वीट

लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात केलं ट्वीट

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. 13 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 400 च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 89 आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. इतकी गंभीरर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात आज सकाळी ट्विटरवर जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

'कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचं वातावरण असलं तरीही सरकारकडून हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बस, लोकल, मेट्रो, खासगी ऑफिसेस, शाळा, कॉलेज, मैदान, गार्डन सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार असल्यानं नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

First published: March 23, 2020, 10:49 AM IST

ताज्या बातम्या