देशातील सर्वात जास्त लांबीच्या बोगद्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

देशातील सर्वात जास्त लांबीच्या बोगद्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चेनानी-नाशरी बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं.

  • Share this:

02 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील आशियातील सर्वात लांबीच्या चेनानी-नाशरी बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं. एनएच 44 या राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हा बोगदा 9.2 किलो मीटर लांबीचा असून या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर प्रवासाचे 2 तास वाचणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर ओपन जीपमधून या प्रवासाचा आनंदही घेतला. एका ठिकाणी तर पंतप्रधानांनी जीपमधून उतरून काही अंतर चालत कापलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

भारतातला सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बोगदा असून या बोगद्यासाठी 2 हजार 519 कोटींचा खर्च आला आहे. तसंच, या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ 360 Degree बघता येईल असे 124 सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. तर या बोगद्यामुळे दरदिवशी 27 लाख तर दरवर्षी सुमारे 99 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. चेनानी आणि नाशरी यामधील अंतर 41 कि.मी. इतकं होतं ते आता 10.9 कि.मी इतकं कमी झालं आहे. या बोगद्याच्या दर ३०० मीटर अंतरावर बाहेर निघण्यासाठी छोटे समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत.

या बोगद्यामुळे आता 12 महिने श्रीनगरचा देशाबरोबर संपर्क राहील हवामानामुळे कधीही देशाशी संपर्क तुटणार नाही. तसंच या रस्त्यावरुन सुरक्षित आणि सर्व ऋतुमध्ये प्रवास करणं शक्य होणार आहे. या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली असून त्यातून जम्मू-काश्मिरमधील व्यापाराला आणि पर्यटनाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 06:56 PM IST

ताज्या बातम्या