Home /News /national /

पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार?

पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार?

दुसरा देशव्यापी लॉकडाऊन संपण्यास सहा दिवस उरले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.

नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाला परतवण्यासाठी लागू केलेला 19 दिवसांचा दुसरा देशव्यापी लॉकडाऊन संपण्यास सहा दिवस उरले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा करत आहेत. तसंच या चर्चेवेळी लॉकडाऊनच्या कालावधीबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. देशव्यापी लॉकडाउन लागू होऊन 3 मे रोजी 40 दिवस होणार आहेत. या कालावधीत कोरोनाचे संकट संपलेले नसून देशातील प्रमुख शहरांमध्ये ते आणखी गंभीर झाले आहे. या परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी पुढची रणनीती काय असेल, यावर मुख्यमंत्र्याच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत? देशातील अनेक राज्यांना 3 मे पर्यंत असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आगामी काही दिवसांसाठी अजून वाढवण्यात यावा असं वाटत आहे. तेलंगणा या राज्यात यापूर्वीच काही दिवस लॉकडाऊन वाढवले आहे. दिल्ली , महाराष्ट्र ,मध्य प्रदेश,पश्चिम बंगाल , पंजाब आणि ओडिसा या राज्यांनी लॉक डाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज होत असलेल्या चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीत लॉकडाऊन आगामी 16 मे पर्यंत वाढवायचे आहे, असे दिल्ली सरकारचे म्हणणे असल्याची माहिती आहे. यानंतर एक दिवसानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या पाच राज्यांनी 3 मेनंतर आपापल्या राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हॉटस्पॉट भागात कोणतीही सवलत मिळणार नाही. याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही इतर सहा राज्ये केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करतील असे म्हणत आहेत . दुसरीकडे, आसाम, केरळ आणि बिहार यांचे म्हणणे आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर हा निर्णय घेतील. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Narendra modi, Uddhav thackeray

पुढील बातम्या