मुंबई, 03 मार्च : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या 5 घडामोडी वाचा एका क्लिकवर
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून दिली आहे. मोदी सोशल मीडिया का सोडणार याची आता राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.
सविस्तर बातमी वाचा-PM मोदींची मोठी घोषणा, रविवारी सोशल मीडिया सोडणार
2. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांविरूद्ध सूनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचा-सुनेचा छळ केल्याप्रकरणी NCPच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
3. धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला, बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पतीपत्नीचा आरोप आहे.
सविस्तर बातमी वाचा-लज्जास्पद! 'बलात्काराची तक्रार दिल्यानंतर पोलीस माझ्यावर हसले', पीडितेचा दावा
4.दिल्लीसह देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणात 4 गुन्हेगारांना उद्या म्हणजे 3 मार्चला फाशी देण्यात येणार होती. पण अखेरच्या क्षणी कोर्टाने या चौघांची फाशी थांबवण्याचे आदेश दिले. पटियाला न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पुढचे आदेश मिळत नाहीत तोवर आता ही फाशी होणार नाही.
सविस्तर बातमी वाचा-फाशी पुन्हा लांबणीवर! निर्भयाचे गुन्हेगार पुढच्या आदेशापर्यंत फासावर नाहीत
5.चीनहून भारतात परतलेले कोरोनाव्हायरसचे पहिले 3 रुग्ण नुकतेच बरे झाले, भारत सुटकेचा निश्वास टाकतो न टाकतो तोच आता महाभयंकर असा कोरोनाव्हायरस (COVID-19) भारतात पुन्हा आला आहे. देशात कोरोनाव्हायरसचे आणखी 2 रुग्ण आढळून आलेत. नवी दिल्ली (New delhi) आणि तेलंगणामध्ये (Telangana) प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
सविस्तर बातमी वाचा-Alert! भारतात पुन्हा आला महाभयंकर 'कोरोना', 2 रुग्णांना व्हायरसची लागण
6. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
सविस्तर बातमी वाचा-दहावीची परीक्षा आजपासून सुरू, परीक्षा केंद्रावर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा