मराठी बातम्या /बातम्या /देश /

PM मोदींआधीच 'या' राज्यांनी वाढवला लॉकडाऊन, आज पंतप्रधानांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

PM मोदींआधीच 'या' राज्यांनी वाढवला लॉकडाऊन, आज पंतप्रधानांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

**EDS: TV GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi interacts with media heads through video conferencing on COVID-19, in New Delhi, Monday, March 23, 2020. (DD News/PTI Photo)(PTI23-03-2020_000069B)

**EDS: TV GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi interacts with media heads through video conferencing on COVID-19, in New Delhi, Monday, March 23, 2020. (DD News/PTI Photo)(PTI23-03-2020_000069B)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. मात्र त्याआधीच अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाउन कालावधी आज पूर्ण होणार आहे. आता प्रश्न असा आहे की पुढे काय? याचे उत्तर काही तासांनी मिळेल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. मात्र त्याआधीच अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुमारे 10 मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर अशी अनेक राज्ये आहेत ज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.

देशात सर्वप्रथम ओडिशाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. त्यानंतर पंजाबने 1 मेपर्यंत तर, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल यांनी 30 एप्रिलपर्यंच लॉकडाऊन वाढवला आहे. कर्नाटक सरकारने दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. याशिवाय ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि मेघालय यांनीही लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला आहे.

का वाढवला जाणार लॉकडाऊनचा कालावधी?

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज सरासरी 796 नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत देशभरात 9 हजार 352 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. 324 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 980 लोक कोरोनाला हरवत निरोगी झाले आहे. राज्यांमध्ये सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्राची असून कोरोना बळी पडलेल्यांची संख्या 2334वर पोहोचली आहे. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत आतापर्यंत 1510 रूग्ण समोर आले आहेत. तामिळनाडूमध्ये 1173, राजस्थान 897, मध्य प्रदेश 614, उत्तर प्रदेश 558 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

20 दिवसांत 18 पटीने वाढली प्रकरणे

24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केले, त्यावेळी कोरोना नुकताच देशात पाऊल ठेवले होते. 24 मार्च रोजी देशात फक्त 519 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली, त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला, तर केरळमधील तीन लोक बरे झाले होते. मात्र आता हा आकडा 2334वर पोहचला आहे.

First published:

Tags: Corona