Home /News /national /

पंतप्रधान मोदी 8 वाजता पुन्हा देशाला करणार संबोधित, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता

पंतप्रधान मोदी 8 वाजता पुन्हा देशाला करणार संबोधित, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता

पूर्ण देश कोरोनाच्या भीतीने हैराण झाला असताना एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतामध्ये तब्बल 37 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिसचार्ज देण्यात येणार आहे.

  नवी दिल्ली, 24 मार्च : वैश्विक महामारी कोरोनाव्हायरसचा फैलाव हा वेगाने वाढत आहे. त्यावर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. 24 मार्चला रात्री 8 वाजता मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोनाविषयी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आधीही पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आणि त्याला देशातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदी हे जनतेला महत्त्वाच्या सूचना देणार असून काही कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

  लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात काळ ट्विटरवर जनतेला आवाहन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज रुग्णालयातून होणार सुट्टी पूर्ण देश कोरोनाच्या भीतीने हैराण झाला असताना एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतामध्ये तब्बल 37 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिसचार्ज देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ झाली नसून तो आकडा 9वरच आहे. त्यामुळे भारत कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी होणार असंच म्हणावं लागेल. 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. तर मुंबईतही एक जोडपं कोरोनावर मात करून घरी जाणार आहेत. आज त्यांची अखेरची चाचणी करण्यात येणार आहे. किराणा दुकाने या वेळेतच खुली राहणार? व्हायरल मेसेजला मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर खरंतर देशामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता तात्काळ कठोर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मदत होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, यापैकी बहुतेकांना कोणत्याही औषधाची गरज नाही आहे. सध्या त्यांच्यावर सहाय्यक उपचार केले जात आहेत. भारतातील बहुते लोकांमध्ये सौम्य संसर्ग आहे. सध्या केवळ 5 टक्के लोकांना ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे. कोरोनाचा महाभयंकर टप्पा, 4 दिवसात तब्बल 1 लाख लोकांना या व्हायरसची लागण
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या