कोरोना लस घेतल्यानंतर काय म्हणाले पंतप्रधान? नर्सनं सांगितलं उत्तर

कोरोना लस घेतल्यानंतर काय म्हणाले पंतप्रधान? नर्सनं सांगितलं उत्तर

कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा (corona vaccination) आजपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मार्च : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा तिसरा टप्पा  (corona vaccination) आजपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या नर्स पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन लस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये मोदींना दोन नर्स लस घेतल्याचं दिसत आहे. यामध्ये एक नर्स मोदींच्या मागे उभ्या असून एक नर्स मोदींना लस देत आहे. मोदींना लस देणाऱ्या नर्स पी. निवेदा (P Niveda) या पुदुच्चेरीच्या आहेत. त्या गेल्या तीन वर्षांपासून नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात काम करतात.

पंतप्रधान मोदींना लस देतानाचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. 'आज सकाळीच पंतप्रधान मोदींना लस देण्याची सूचना त्यांना देण्यात आली. पंतप्रधानांना भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या लशीचा दुसरा डोस अजून बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी माझी विचारपूस केली. तसंच डोस कधी दिला हे आपल्याला जाणवलं देखील नाही,' असं मोदी म्हणाले असं निवेदा यांनी दुरदर्शनशी बोलताना सांगितले आहे.

केरळमधील सिस्टर रोसम्मा अनिल (Rosamma Anil) या देखील यावेळी उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींना लस द्यायची जबाबदारी आपल्यावर असल्याचं आज सकाळीच समजलं. हा एक सुखद धक्का होता असं त्यांनी सांगितलं.

देशात लसीकरणाच्या (corona vaccination) तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात तिथे हे लसीकरण देण्यात येणार आहे.

तसंच शासनाच्या निर्धारित रुग्णालयात लसीकरण विनामूल्य आहे, तर खाजगी रुग्णालयात मात्र लसीकरणाच्या प्रत्येक डोससाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 1, 2021, 10:42 AM IST

ताज्या बातम्या