'डिअर बाबा, मुंबईतून पळून येण्याची गरज नाही'; मोदींनी शेअर केला लेकीने वडिलांना लिहिलेल्या पत्राचा VIDEO

'डिअर बाबा, मुंबईतून पळून येण्याची गरज नाही'; मोदींनी शेअर केला लेकीने वडिलांना लिहिलेल्या पत्राचा VIDEO

मोदींनी Be Corona Warrior या मोहिमेला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकांना, जेथे आहात तेथेच रहाण्याचे आवाहन केले. तरी, घराबाहेर असणारी लोकं घराकडे जाण्याच्या वाटा शोधत आहेत. यासाठी मोदींनी Be Corona Warrior या मोहिमेला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

मोदींनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमध्ये एका मुलीने आपल्या वडीलांना पत्र लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलगी आपल्या वडीलांना विनंती करत आहे की, घराबाहेर पडू नका, तुम्ही घराबाहेर पडलात तर कोरोना जिंकेल. घरी येण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा कोरोना आपल्यावर आणखी वर्चस्व गाजवेल. अशा परिस्थितीत आपण जिथे आहात तिथे राहा, असा सल्लाही दिला आहे.

व्हिडिओमध्ये मुलगी, "डिअर बाबा, मी तुला अजिबात मिस करत नाही आहे. आईसुद्धा करत नाहीये. मुंबईतून पळून येण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच रहा आपण बाहेर पडल्यास कोरोना जिंकेल आणि आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे", असे आपल्या वडीलांना पत्राद्वारे सांगितले.

एका दिवसात 88 नवे रुग्ण सापडले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तर एका दिवसात देशभरात 88 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता भारत अजून तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही ही दिलासा देणारी गोष्ट आहे.

धक्कादायक! 4 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, लहान मुलांमध्ये धोका वाढला

डास चावल्याने कोरोना होतो? या 7 गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका

First published: March 27, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या