भाजपच्या विरोधात 'महाआघाडी' नाही तर 'महामिलावट', मोदींचा काँग्रेसवर घणाघात!

भाजपच्या विरोधात 'महाआघाडी' नाही तर 'महामिलावट', मोदींचा काँग्रेसवर घणाघात!

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसवर टीका करताना सर्व लक्ष्य मात्र 2019 च्या निवडणुकीवर होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : निमित्त राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेचं, रोख मात्र 2019 च्या निवडणुकीवर. लोकसभेत गुरूवारी राजकीय चर्चेनं वातावरण तापलं होतं. दिवसभर चाललेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडाखेबंद उत्तर दिलं. राफेल, नोटबंदी, घटनात्मक संस्थांचा अपमान, लोकशाहीची हत्या, महाआघाडी,  आघाडीचं राजकारण, या सर्व विषयांवर मोदींनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. भाजप आणि एनडीएच्या विरोधात जी 'महाआघाडी' होत आहे ती महाआघाडी नाही तर 'महामिलावट' आहे असा आरोपही मोदींनी केला आणि महाआघाडीची हवा काढण्याचा प्रयत्न केला. देश आम्हाला पुन्हा एकदा सधी देईल असंही मोदींनी सांगितलं.

महाआघाडीत जे पक्ष आहेत ते अटलजींच्या काळात आमच्यासोबत होते. धोकेबाजी करून ते गेले ही त्यांची सवय आहे. महाआघाडीत असणारे सर्व पक्ष हे घराणेशाहीचे पक्ष असून त्यातले बहुसंख्य नेते हे जामीनावर आहेत.  काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याची आठवणही मोदींनी करून दिली.

रोजगाराच्या संधी वाढल्या

असंघटीत क्षेत्र  देशात 80 ते 90 टक्के नोकऱ्या देतं तर संघटीत क्षेत्र फक्त 10 टक्क्यांच्या आसपास नोकऱ्या देतं. आत्तापर्यंत देशात नोकरींचा हिशेब ठेवण्याची कुठलीच व्यवस्था विकसित झाली नव्हती. गेल्या वर्षभरात 1.80 कोटी लोकांनी पीएफ खाती सुरू केली आहेत. रोजगार जर मिळाला नाही तर ही खाती सुरू कशी झाली? असं सांगत मोदींनी बेरोजगारी वाढली या आरोपांना उत्तर दिलं.

चार वर्षात 36 लाख ट्रक विकले गेले, मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक वाहनं आणि  ऑटोंचीही विक्री झाली. यात दीडकोटींपेक्षां जास्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. हॉटेल व्यवसायातही काही कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या.

युपीएने मोठा गाजावाजा करून कर्जमाफी योजना जाहीर केली केली होती त्यावेळी शेतकऱ्यांवर 6 लाख कोटी होतं. सरकारने माफ केलं फक्त 70 हजार कोटी. हा सगळा पैसा बँकांमध्ये असलेल्या काही मोठ्या लोकांच्या खिशात गेले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

देशाचं हवाईदल मजबूत व्हावं असं काँग्रेसला वाटत नाही. राफेल  हवाई दलाला मिळू नये असं काँग्रेसला वाटतं हा माझा गंभीर आरोप आहे.

राफेलच्या प्रत्येक मुद्यावर निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. तरीही खोटे आरोप काँग्रेस करत आहे. आत्तापर्यंत एकही संरक्षण करार दलाली दिल्याशीवाय झाला नाही. त्यामुळे आता काँग्रेसला अडचण वाटते.

या आधी लोक कर्ज बुडवायचे आणि पळून जात होते. आज पळून गेलेल्यांची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. पळून गेलेल्या लोकांना भारतात आणलं जात आहे.

काँग्रेस म्हणतं सर्जिकल स्ट्राईक का केला? काँग्रेसने लष्कराला साधी बुलेटप्रुफ जॅकेट दिले नाहीत. जवानांना घालायला बुट नव्हते. तुम्ही काय करणार सर्जिकल स्ट्राईक, तुम्ही विचारही करू शकत नव्हता.

मी एवढा सर्वसामन्य नागरिक आहे ज्याने एवढ्या मोठ्या सत्तेला, घराण्याला आव्हान दिलं. त्यामुळेच त्यांना ते पचत नाही.

तुम्हाला काम करायचे होते तर तुम्ही देश स्वतत्र्य झाल्यानंतर पहिल्या दोन शतकात देशातील सर्व ठिकाणी वीज का पोहचवली नाही.

तुम्हाला काम करायचे होते तर तुम्ही देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या दोन शतकात देशातील सर्व ठिकाणी वीज का पोहोचवली नाही.

काँग्रेस सरकारने 55 वर्षात 25 लाख घरं बनवले आम्ही 55 महिन्यात 1 कोटींपेक्षा जास्त घरं दिले. केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय तुम्ही फाडला होता हे विसरता काय?

तुम्ही आरोप करता मोदी संस्थांना संपवत आहेत? देशात आणीबाणी काँग्रेसने लावली, देशाच्या सैनिकांचा काँग्रेसने अपमान केला, देशाच्या लष्करप्रमुखाला गुंड म्हटलं.

मोदींवर टीका करत असताना काँग्रेसने देशाची बदनामी केली. लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने काय साधलं.

निवडणुकीचे वाईट परिणाम आले की EVMवर खापर फोडलं जातं. काँग्रेसने हा बालीशपणा सोडला पाहिजे.

तुमचे 55 वर्षे माझे 55 महिने याची तुलना करण्यास तयार आहे. साडेचार वर्षात 10 कोटी शौचालय बनवले, 55 वर्षात 12 कोटी गॅस कनेक्श दिले आणि आम्ही 55 महिन्या 13 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत.

विदेशी पैशावर चालणाऱ्या 20 हजार संस्था आम्ही बंद केल्या. काँग्रेसने या संस्था का केल्या नाहीत?

काँग्रेसमुक्त भारत हे माझं नाही तर महात्म गांधी यांचे स्वप्न होतं. महात्माजींच स्वप्न मी पूर्ण करत आहे.

VIDEO : आदित्य ठाकरेंना अजित पवारांच्या मुलाची टक्कर? पार्थची विद्यार्थी राजकारणात एंट्री

First Published: Feb 7, 2019 07:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading