पहले सब भोले के भरोसे छोड दिया था, आता विकास होतोय - नरेंद्र मोदी

'चार वर्षांपूर्वी सगळा देश आणि बनारसचा विकास थांबला होता. सगळं देवाच्या भरोश्यावर सोडलं गेलं होतं'

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 03:38 PM IST

पहले सब भोले के भरोसे छोड दिया था, आता विकास होतोय - नरेंद्र मोदी

वाराणशी,ता.18 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणशीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातल्या जाहीर सभेत विरोधी पक्षांवर टीका केली करत केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. चार वर्षांपूर्वी सगळा देश आणि बनारसचा विकास थांबला होता. सगळं देवाच्या भरोश्यावर सोडलं गेलं होतं. आता परिस्थिती बदललीय. आता विकासाने वेग घेतला आहे. पूर्वी बनारस जसं होतं तसं आता नाही. आम्ही प्राचीन परंपरा जपत आधुनिकतेचा समावेश करत आहेत असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणशीत सोमवारी वाढदिवस साजरा केला आणि आज वाराणशीसाठी 550 कोटी रूपयांच्या विविध विकास योजनांचं भुमीपूजन केलं. लोकसभेच्या निवडणुकांना अजुन 6 महिने शिल्लक आहेत. मात्र सर्वच नेत्यांच्या भाषणांचा फोकस सध्या आगामी निवडणुकांवरच असल्यानं तेच प्रतिबिंब पंतप्रधानांच्या भाषणातही बघायला मिळालं.

पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात विकास कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले बनारस हिंदू विद्यापीठ हे एक आधुनिक विद्यापीठ म्हणून ओळखलं जाईल असा त्याचा विकास होणार आहे. भारतातल्या प्राचिन पंरपरांचा अभिमान बाळगत त्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल.

पूर्वी वाराणशीत आल्यानंतर आकाशात सगळ्या तारा आणि वायर्स दिसत असे. आता वाराणशीतल्या एका मोठ्या भागातले हे वायर्स जमीनीखालून टाकण्यात आले आहेत. असंच का हे पूर्ण शहरातही होणार आहे.

गंगा नदीच्या स्वच्छतेच्या दिशेने मोठं काम झालं असून गंगेत आता फक्त होड्याच नाही तक क्रुझही चालू शकते.

गंगेचे किनारे स्वच्छ झाले आहेत. पर्यटकांची संख्या वाढली आहे. यापुढेही याच वेगाने विकास होत राहिल अशी ग्वाहीही त्यांनी आपल्या मतदार संघातल्या लोकांना देत विकास न केल्याबद्दल काँग्रेसला चिमटे काढले.

VIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळवले पैसे!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close