कर्नाटकचा निकाल लागताच PM मोदींनी शिवसेनेवर साधला निशाणा

कर्नाटकचा निकाल लागताच PM मोदींनी शिवसेनेवर साधला निशाणा

'संधी मिळताच जनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवते,' असं म्हणत नरेंद्र मोदींना शिवसेनेला इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दमदार विजय झाला आहे. 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला 6 जागांवर विजय मिळाला आहे तर 6 जागांवर आघाडी घेतली आहे. हा विजय निश्चित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला इशारा दिला आहे. 'संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते,' असं म्हणत नरेंद्र मोदींना शिवसेनेला इशारा दिला आहे.

'कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,' असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

'कर्नाटकमध्ये आता जोडतोडीचं नाही तर स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे. झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही. काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर करून घेते. त्यानंतर आपल्या हितासाठी सोबत असलेल्या पक्षांना वापरून घेते. याचा परिणाम म्हणजे लोकांना कधीही चांगलं सरकार मिळत नाही,' अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

भाजप...शिवसेना आणि महाराष्ट्रातील सत्तानाट्य

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. भाजपला काडीमोड दिल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक केली. शिवसेनेचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपने अजित पवार यांची मदत घेतली मात्र ही खेळी भाजपवरच उलटली. भाजपचं सरकार अवघ्या 79 तासांत कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचं सरकरा स्थापन झालं.

महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या सत्तानाट्यानंतर निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. मात्र असं असलं तरीही हे तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 9, 2019, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading