दिल्लीतील सभेत PM मोदींचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

दिल्लीतील सभेत PM मोदींचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 22 डिसेंबर : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत झालेल्या प्रचारसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'हे विधेयक पारित झाल्यानंतर विरोधक जनतेला भ्रमित करत आहेत. खोटं बोलत आहेत. जेव्हा दिल्लीतील कच्ची घरं आम्ही पक्की केली तेव्हा आम्ही कोणी कुठल्या धर्माचे आहे हे विचारले होते का ? काही पुरावे मागितले होते का?' असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच याच सभेत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.

'जे मुख्यमंत्री म्हणतात हा कायदा लागू करणार नाही, त्यांनी आपल्या मुख्य महाधिवक्त्यासोबत थोडी चर्चा करा. राज्य असे करू शकते की नाही हे विचारा. मुख्यमंत्री असं बोलून स्वतःचे हसे करून घेत आहेत,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.

भाजप आमदाराने केला जमावबंदीच्या आदेशाचा भंग, गुन्हा दाखल

'विरोधक नागरिकत्व कायद्याच्या नावाने लोकांना फसवत आहेत. नागरिकत्व कायद्याचा विरोध करणारे लोक हिंसाचार माजवत आहेत. देशात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. मोदीचा पुतळा जाळा पण गरीबाची रिक्षा जाळू नका,' असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या सभेवेळी मैदानात उपस्थित लोकांनी दिल्ली पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

मोदींच्या काँग्रेसवर घणाघात

'हिंसाचाराला काँग्रेसची मुक संमती आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत 35 हजार पोलीस शहीद झाले आहे. देशातील हिंदू किंव्हा मुस्लीम लोकांसाठी हा कायदा नाही. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवादी लोकांना फसवण्यासाठी खोटे बोलत आहेत,' असा घणाघाती आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 22, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या