नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली एक सिक्रेट गोष्ट आज शेअर केली आहे. त्यांच्या खास मित्रासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींचं प्राणी आणि पक्षी प्रेम अपार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप अॅक्टीवही असतात. पण त्यांना आपल्या एका खास मित्रासोबत वेळ घालवायला आवडतो.
पंतप्रधान निवासस्थानी (PM House) असलेल्या मोरांसोबत नरेंद्र मोदी वेळ घालवताना आणि त्यांना खायला देतानाचे खास क्षण त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याआधी देखील त्यांच्या बागेमध्ये अनेकवेळा मोर आणि लांडोर मुक्त विहार करताना पाहायला मिळाले आहेत.
हे वाचा-कराचीतही 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर! मराठमोळ्या नाईकांनी अशी जपली आपली संस्कृती
पंतप्रधान मोदी मोराला अगदी प्रेमानं खायला देताना या फोटोंमध्ये दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोर त्यांच्या अगदी जवळयेऊन त्यांच्यासोबत बसून खात असल्याचं पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला आहे. पंतप्रधान मोदींना निसर्ग आणि प्राणी-पक्षांवर असणारं प्रेम यातून आपल्याला दिसत आहे.